Uddhav Thackeray criticizes Congress at solapur
Uddhav Thackeray criticizes Congress at solapur 
पश्चिम महाराष्ट्र

देशहित सोडून लूट केली म्हणून काँग्रेसवर ही वेळ : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : अस्थिर सरकारला शिवसेनेने साथ दिली, म्हणून चांगले सरकार राज्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारने अनेक चांगल्या योजना राबविल्या. सरकार आल्यावर एखादी गोष्ट पटली नाहीतर मी बोलायला तयार आहे असे सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशहित सोडून कॉंग्रेसने लूट करायला सुरवात केल्याने त्यांच्यावर ही वेळ आल्याचे सोमवारी सांगितले. 

कर्णिकनगर येथे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांच्यासाठी आयोजिलेल्या सभेत ठाकरे बोलत होते. या वेळी मंचावर शहर मध्यचे उमेदवार माने, शहर उत्तरचे उमेदवार तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहपालकमंत्री तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. तानाजी सावंत, खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, माजी आमदार रतिकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेना समन्वयक शिवाजी सावंत, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे, नगरसेवक राजकुमार हंचाटे, भारत बडुरवाले, लक्ष्मण जाधव, महिला आघाडीच्या नेत्या संजना घाडी, अस्मिता गायकवाड, उज्ज्वला येलुरे, अजय दासरी, रामचंद्र जन्नू, रोहन देशमुख, मनीष काळजे, प्रवीण डोंगरे, हरिभाऊ चौगुले, विष्णू कारमपुरी, पृथ्वीराज माने आदी उपस्थित होते. 

"सुशीलकुमार शिंदे खरे बोलले. कॉंग्रेस आता थकली आहे. कॉंग्रेस आता पूर्वीसारखी राहिली नाही. त्या काळात कॉंग्रेसमध्ये दर्जेदार नेते होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान होते. देशहित सोडून आता कॉंग्रेसने देश लुटायला सुरुवात केली, त्यामुळे त्यांच्यावर ही स्थिती आली आहे' असे ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केले. 

इतकी वर्षे सत्ता असूनही कॉंग्रेसने सोलापूरसाठी काहीच केले नाही. क्‍लस्टर योजना का झाली नाही?, विमानतळ का ओस पडला आहे? असा सवाल करून ठाकरे यांनी सत्ता आल्यावर आम्ही मार्कंडेय विकास महामंडळ स्थापन करू. सोलापूरच्या पाण्याचा प्रश्‍न लवकरच सुटेल असे सांगितले. सर्व जाती-धर्माचे लोक शिवसेनेसोबत आहेत. मुस्लिम धर्मीय बांधवही आता शिवसेनेसोबत आहेत. केंद्र सरकारने 370 कलम काढले, आता बांगलादेशी लोकांनाही देशातून बाहेर काढले पाहिजे. विशेष कायदा करून राम मंदिर बांधावे, असेही या वेळी सांगितले. 

उमेदवार दिलीप माने म्हणाले, ""दोन्ही देशमुखांसोबत जनता मला विधानसभेत पाठवेल हा विश्‍वास आहे. आम्ही 50 वर्षे कॉंग्रेसमध्ये होतो. आता कॉंग्रेस नेतृत्वहीन झाले आहे. मला वाईट वाटत आहे, त्यांना अध्यक्षही मिळत नाही. शहर मध्य मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. लोक आता निवडून येणाऱ्या पक्षासोबत आहेत.'' 

मतदारांनी आता गाफील राहायचे नाही. शिवसेनेत जिवंत माणसे आहेत. ज्यांनी हरामखोरी केली, भगव्याशी गद्दारी केली त्यांना जागा दाखवून द्या. त्यांच्या नादी लागायचे नाही. आपली एकच निशाणी धनुष्यबाण असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता महेश कोठे यांना टार्गेट केले. 

भगवा दहशतवाद म्हणणारे आता थकले आहेत. सोलापूरकरांनी सुशीलकुमार शिंदे कुटुंबीयांवर प्रेम केले, कॉंग्रेसने त्यांना विविध पदे दिली पण त्यांनी सोलापूरसाठी काहीच केले नाही. दहा रुपयांत जेवण देणारच. मी स्वयंपाक केला तर लोकांना चालेल पण अजित पवार यांनी दिलेले पाणी चालेल का? लोकांचा आमच्यावर विश्‍वास आहे. 
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT