Udid, Mug MSP Center started in October
Udid, Mug MSP Center started in October 
पश्चिम महाराष्ट्र

उडीद, मुगाची हमीभाव खरेदी केंद्र ऑक्‍टोबरमध्ये सुरू

संतोष सिरसट

सोलापूर- राज्यात आता मूग व उडीद या पिकांची काढणी सुरू झाली आहे. काही प्रमाणात हे धान्य बाजारपेठेतही येऊ लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी "सकाळ'ला दिली आहे. 

मूग व उडीद या पिकाची प्रामुख्याने मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. खरीप हंगामामध्ये येणारी ही पिके आहेत. मराठवाड्याबरोबरच काही प्रमाणात विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रातही ही पिके घेतली जातात. सोलापूर, बीड, सांगली, औरंगाबाद, लातूर, अमरावती, जालना या जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील इतर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे चांगला पाऊस झालेल्या जिल्ह्यात या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होण्याची शक्‍यता आहे.

सध्या मूग व उडीद बाजारपेठेत दाखल झाले आहेत. पण, हमीभाव केंद्र सुरू नसल्याने मिळेल त्या भावाने शेतकरी ते विकून टाकत आहेत. या पार्श्‍वभूमिवर पणनमंत्री देशमुख यांच्याशी चर्चा केली असता एक-दोन दिवसात या पिकांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारपेठांची मागणी लक्षात घेता हमीभाव केंद्रे सुरू केली जातील. सध्याच्या मूग व उडीदामध्ये दमटपणा जास्त असते. त्यामुळे ते कदाचित नाकारले जाण्याची शक्‍यता असते. पुढील 15 दिवसात दमटपणा कमी झाल्याने हमीभाव केंद्रावर तो स्वीकारण्यात येईल असेही देशमुख यांनी सांगितले.

उडीद व मुगाची हमीभाव केंद्र सुरू झाल्यानंतर सोयाबीनची केंद्र सुरू करण्यावर भर असेल. उडीद व मूगापेक्षा सोयाबीन थोड्या उशिराने बाजारात येते. पण, ते बाजारात येण्यापूर्वी हमीभाव केंद्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल. 
सुभाष देशमुख, पणनमंत्री 


मागील वर्षी झालेली खरेदी 
-मूग-54 हजार 341 क्विंटल 
-हमीभावाने शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम-30 कोटी 29 लाख 53 हजार 
-उडीद-पाच लाख 86 हजार 639 
-हमीभावाने शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम-316 कोटी 78 लाख 53 हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT