navale
navale 
पश्चिम महाराष्ट्र

दारूबंदीचा पापरी पॅटर्न तालुकाभर राबविणार : पोलिस निरीक्षक कोकणे

राजकुमार शहा

मोहोळ : पापरी येथील महिलांनी धाडसाने दारुविक्री विरोधात लढा उभारून गावातील दारु बंद केली आहे, ग्रामपंचायतीनेही दारुबंदीसाठी सहकार्य केले आहे, ही बाब खरोखरच गावच्या विकासाच्या व गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे, हाच दारूबंदीचा पापरी पॅटर्न तालुकाभर राबविणार असल्याचे प्रतिपादन मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी केले.  

पापरी (ता. मोहोळ) येथे सोमवारी (ता. 8) दारुबंदी महिला समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार पोलिस निरिक्षक कोकणे यांच्या हस्ते संपन्न  झाला. त्यावेळी ते गावातील महिला व ग्रामस्थांना मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी सरपंच इंदुमती लोंढे होत्या. उपसरपंच अजित भोसले, माजी सैनिक चंद्रकांत लोंढे, पोलिस पाटील प्रशांत भोसले, रवि पाटील, ग्रामसेवक दीपक शेळके, बाळासो टेकळे, अभिजीत चौधरी, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष सतीश भोसले, बबन वाघमारे, लक्ष्मण घागरे, पोलीस नाईक बिराजदार, हवालदार दळवी, महिला पोलिस कर्मचारी धोत्रे व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

कोकणे म्हणाले, पापरीच्या महिलांसारखे धाडस इतर गावातील महिलांनीही दाखवावे व अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, पोलिस प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे. चांगल्या कामासाठी ग्रामपंचायतींनी अवाहन स्वीकारावे, तर चांगल्या कामात राजकारण बाजुला ठेवावे असे सांगत, गावात छुप्या पद्धतीने  सुरू असलेली दारूविक्री लवकरच बंद करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

गावात स्थापन केलेल्या दारुबंदी  महिला समितीमधे ज्या महिला गेल्या 5 ते 6 वर्षांपासून दारुबंदीसाठी परिश्रम घेतले आहेत. त्या महिलांमधील सर्व महिलांच्या संमतीने अध्यक्ष, उपाध्यक्ष त्यांचे इतर 14 महिला सहकारी,  सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, ग्रामसेवक, गावातील जिल्हा परिषद, माध्यमिक प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटीने ठरवून दिलेले दोन सदस्य, गावातील पुरुषांचाही समावेश यात राहणार आहे.

दारुबंदी महिला समिती अध्यक्ष म्हणून शोभा भोसले व उपाध्यक्ष म्हणून संगीता वाघमारे यांची निवड करण्यात आली, तर, लक्ष्मण घागरे, विलास टेकळे, हरीश गायकवाड, रमेश टेकळे, पिंटू गायकवाड या गावकऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT