पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : चंदगडमध्ये भाजपकडून ‘आयडियल’ प्रयोग

सुनील कोंडुसकर

चंदगड - चंदगड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांकडून उमेदवारीची कोंडी फुटत नसल्याने संभ्रमावस्था असताना राजकारणात नवे वळण आले आहे. भाजपकडून हा मतदारसंघ ‘आयडियल मॉडेल’ म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत यावर खलबते झाली असून, या मतदारसंघातून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील किंवा केंद्रीय पेट्रोलियममंत्र्यांचे स्वीय सहायक प्रकाश बेलवाडे यांच्या नावांची चर्चा झाल्याचे समजते. 

या मतदारसंघात सध्या भाजपकडून सर्वाधिक इच्छुकांची संख्या आहे. गोपाळराव पाटील, भरमूअण्णा पाटील, रमेश रेडेकर, शिवाजी पाटील, कृष्णा पाटील, अशोक चराटी, ॲड. हेमंत कोलेकर आदींनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. डॉ. नंदिनी बाभूळकर यांचे नावही चर्चेत आहे. या स्थितीत यापैकी एखादा उमेदवार निश्‍चित केल्यानंतर अंतर्गत पातळीवर स्थानिक राजकारणातून बेकी घडू नये, याची खबरदारी म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाच इथे उमेदवारी द्यायची आणि सर्वांना एका छताखाली कामाला लावायचे, असा भाजपच्या वरिष्ठांचा प्रयत्न आहे.

बेलवाडे यांना उमेदवारीबाबत त्यांना फारसा ‘इंटरेस्ट’ नसला तरी पक्षाने आदेश दिल्यास त्यांना तो पाळावा लागणार आहे. शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी दिग्गजांच्या या विभागात सभा घेण्यात येतील. भाजपच्या कडक शिस्तीत स्थानिक सर्व नेत्यांना निवडणुकीच्या कामात जुंपले जाईल. त्यातून ही जागा विजयी करून राज्यात एक आदर्श मतदारसंघाची प्रतिकृती म्हणून विकसित करण्याचे नियोजन असल्याचे समजते. भाजपचा हा प्रयोग खरोखरच सत्यात उतरणार का, याकडे लक्ष लागले आहे.

विविध जबाबदाऱ्या पेलल्या
प्रकाश बेलवाडे यांचे वडकशिवाले (ता. आजरा) हे मूळ गाव असून, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पेलल्यानंतर सध्या त्यांच्याकडे केंद्रीय पेट्रोलियममंत्र्यांचे स्वीय सहायक पद आहे. ते दिल्ली येथे कार्यरत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT