पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : यड्रावकरांना उमेदवारीबाबत विश्‍वास; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - दोन पिढ्यांचे राष्ट्रवादीशी नाते आहे. त्यामुळे शिरोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी मलाच संधी देईल अशी अपेक्षा आहे. कोणत्याही स्थितीत मतदारसंघातून आपण लढणारच आहे, असा विश्‍वास राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्‍त केला. तसेच शुक्रवारी (ता. 4) अर्ज दाखल करणार असल्याचेही स्पष्ट केले.

दरम्यान कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेस सोडल्याचे जाहीर केले आहे; मात्र यड्रावकरांनी प्रसंगी बंडाची तयारी केल्याने संघटनेत अस्वस्थता आहे. जागा देवून अडवणूक करण्याची भूमिका असेल तर आघाडीत रहायचे की नाही, याचा निर्णय घेवू, अशी भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे. 

शिरोळ मतदारसंघातून शिवसेनेने उल्हास पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर विरोधातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. आघाडीने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली असल्याचे स्पष्ट केले आहे. संघटनेकडून सावकार मादनाईक यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. मात्र राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी लढण्याचा निर्धार केला आहे.

लोकसभा निवडणुकीवेळीच राष्ट्रवादीने यड्रावकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र यानंतर झालेल्या घडामोडीत ही जागा आघाडीने स्वाभिमानीला सोडली असल्याचे जाहीर केले. असे असताना यड्रावकर यांनी उमेदवारी दाखल करण्याचा निर्धार केल्याने शेतकरी संघटनेत अस्वस्थता आहे.यड्रावकर यांनी थांबावे यासाठी पक्षाचे नेते प्रयत्नशील आहेत. मात्र त्यांनी थांबण्यास नकार दिला आहे. राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाहीतर यड्रावकर हे वंचित आघाडी किंवा जनसुराज्यमधून लढतील, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

काँग्रेस - राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या जागा निवडून येण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गरज आहे. कोल्हापूर दक्षिण,कागल विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात संघटनेचे लोक आहेत.त्यांची मदत हवी आहे. मात्र संघटनेच्या उमेदवारीबाबत आघाडीच्या नेत्यांना गांभीर्य नाही. जर शिरोळचा तिढा सोडवला नाहीतर संघटनाही आघाडीत रहायचे की नाही, याचा निर्णय घेईल.

- भगवान काटे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT