पश्चिम महाराष्ट्र

निमित्त सत्काराचे, पेरणी विधानसभेची

आनंद जगताप

पन्हाळा - पन्हाळा तालुक्‍यातील निवृत्त ग्रामविकास अधिकारी वेखंडवाडीचे नामदेव कंदूरकर यांचा नुकताच बांधारी परिसरातर्फे माजी मंत्री विनय कोरे यांच्या उपस्थितीत अमृतमहोत्सव झाला. 

कार्यक्रमात विनय कोरे यांच्या समर्थकांनी घोषणा देत विधानसभेसाठीचा पुकारा दिला. अर्थात या कार्यक्रमात कोरेनी विधानसभेच्या विषयाला हात न घालता कंदूरकर यांच्या कामाचा आढावाच घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेत विनय कोरे यांनी २००४ मध्ये जनसुराज्यशक्‍ती पक्षाची स्थापना केली. त्याच वर्षी त्यांनी चार आमदार निवडून आणले आणि आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. २००९ मध्ये ८ हजाराहून अधिकचे मताधिक्‍याने ते निवडून आले. गेल्या निवडणुकीत मात्र त्यांना अवघ्या ३८८ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या निसटत्या पराभवाने खचून न जाता त्यांनी राजकारण आणि समाजकारण सुरू ठेवले. जिल्हा परिषदेत सहा जागांवर वर्चस्व मिळवले. त्या जीवावर बांधकाम आणि समाजकल्याण सभापतिपद पक्षासाठी मिळविले. 

शाहूवाडीकरांना न्याय देण्यासाठी एक पद सर्जेराव पाटील-पेरीडकर यांना दिले. तसेच बाजार समितीकडील सभापतिपदाच्या रोटेशन पद्धतीला शह देत तेथे बाबा लाड या शाहूवाडीतील आपल्या कार्यकर्त्याला सभापतिपदाची संधी दिली. जिल्हा बॅंक, बाजार समिती, तसेच शेतकरी संघात काँग्रेस-राष्ट्रवादीशी तर जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना, स्वाभिमानीसोबत मैत्री साधत त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपले स्थान कायम ठेवले. आगामी निवडणुकीत गेल्या पराभवाचा डाग पुसून टाकण्यासाठी दोन्ही तालुक्‍यांतील कार्यक्रमांना उपस्थिती लावत संपर्क वाढवला आहे. कर्णसिंह गायकवाडांसोबत त्यांचे सख्य वाढलेले आहे.

कार्यकर्त्यांची ग्वाही
माजी मंत्री कोरे यांनी बांधारी परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. विकास साधण्याचे आश्‍वासनही दिले. शाहूवाडीचे युवा नेते कर्णसिंह गायकवाड, सर्जेराव पाटील-पेरीडकर, बाबा लाड, शेतकरी संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने यांच्यासह पन्हाळा-शाहूवाडीतील जनसुराज्यच्या हजारो कार्यकर्त्यांनी बांधारीतील जेऊरसारख्या छोट्याशा गावात हजेरी लावून विधानसभेसाठी पाठीशी असल्याची ग्वाही दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT