Road problem
Road problem 
पश्चिम महाराष्ट्र

विश्रामबाग-स्फूर्ती चौक रस्ता "शापित' ; महावितरण-महापालिकेचा महाघोळ

सकाळवृत्तसेवा

सांगली : स्फूर्ती चौक-विश्रामबाग रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडलेले आहे. महावितरण-महापालिकेचा महाघोळ आणि समन्वयाअभावी काम थांबले आहे. विश्रामबागकडून येणार निम्माच रस्ता यामुळे सध्यस्थितीत केला जाणार आहे. त्यातही महापालिकेच्या विद्यातु विभागाकडून अडमुठे आणले जात आहेत. त्यामुळे हा रस्ता "शापित' बनला आहे. 
 

स्फूर्ती चौक ते विश्रामबागपर्यंतचा मुख्य रस्त्यावर चोवीस तास वर्दळ असते. या परिसरात मोठी नागरीवस्ती आहे. तसेच विजयनगर भागात सर्व शासकीय कार्यालये असल्याने मोठी वर्दळ या भागात असते. हा रस्ता रुंदीकरण व्हावा, अशी मागणी कित्तेक वर्षांपासून होती. त्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ यांनी यासाठी पुढाकार घेतला. रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यानंतर वालचंद महाविद्यालयानेही जागा दिली. मात्र महावितरण विभागाचे त्या रस्त्यावर डेपो आहे. त्यातील काही जागा रस्त्यासाठी जाणार आहे. मात्र, महावितरण विभागाला पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. गेल्या दीड-दोन वर्षांपासून महावितरण-महापालिका याच विषयावरून महाघोळ सुरू आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले होते. 

या रस्त्यावर वाहतुकीची होणारी मोठी कोंडी छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले आहे. त्यामुळे विश्रामबागकडून येणारा रस्ता तातडीने सुरू करण्यात यावा, अशी सूचना आमदार गाडगीळ यांनी दिली. सध्यस्थितीत हा रस्ता शंभरफुटीपर्यंत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, आता त्यातही रस्त्यावरील विद्युत खांब शिफ्ट करण्यासाठी अडमुठे आणले जात आहेत. यासाठी नगरसेवक विनायक सिहासने यांनी पाठपुरावा घेतले. अखेर आंदोलनाचा इशारा दिला आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून बैठक घेण्यात येणार आहे.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT