पश्चिम महाराष्ट्र

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी काही टोळ्या रडारवर - विश्‍वास नांगरे-पाटील

सकाळवृत्तसेवा

कुपवाड -  वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रामुख्याने गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी काही टोळ्या रडारवर असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी येथे सांगितले. 

श्री. नांगरे-पाटील गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात तपासणी दौऱ्यावर आहेत. आज कुपवाड पोलिस ठाण्यात त्यांनी भेट दिली. त्यावेळी भागातील नागरीक आणि उद्योजकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी प्रभारी पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. नांगरे-पाटील म्हणाले,""शहरांसह जिल्ह्यात घरफोडी, चेनस्नॅचिंगचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खून, खुनीहल्ला यातील गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या जात आहे. मोकासह तडीपारीच्या अनेक कारवाई गेल्या सहा महिन्यांत करण्यात आल्या आहे. येणाऱ्या काळातही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी टोळ्या रडारवर आहेत. लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल.'' 

वाहतूक व्यवस्थेचा आराखडा 
सीसीटीव्हीसह पोलिस चौकासारखे अनेक चांगले उपक्रम शहरात राबविण्यात आले आहे. तसेच अत्याधुनिक यंत्रणेचाही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. विस्कळीत असलेल्या वाहतूक व्यवस्थेसाठी ठोस आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लवकर शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था शहरासह जिल्ह्यात दिसून येईल.

- विश्‍वास नांगरे-पाटील

पोलिसांचाही सत्कार 
गेल्या वर्षात विशेष कामगिरी केल्याबद्दल कुपवाड गुन्हे प्रकटीकरण शाखेने पोलिसांचा विशेष सत्कार श्री. नागरे-पाटील यांच्या हस्ते केला. सीसीटीव्हीसाठी मदत करणाऱ्या नागरीकांचा सत्कार करण्यात आला. नागरीकांच्या तक्रारीचे निरसनही करण्यात आले. 

उद्योजकांशी संवाद 
विश्‍वास नांगरे-पाटील यांनी कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्समध्ये उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, उपाध्यक्ष रमेश आरवाडे, अनंत चिमड यांच्यासह संचालक उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षिततेसाठी पोलिस कर्मचारी अपुरे असल्याचे उद्योजकांनी सांगितले. तसेच चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी विशेष गस्तीपथकाचीही गरज असल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT