Vita Municipal Newsletter: Opposition targets development works of the ruling party
Vita Municipal Newsletter: Opposition targets development works of the ruling party 
पश्चिम महाराष्ट्र

विटा नगरपालिका वार्तापत्र : विरोधकांचा सत्ताधाऱ्यांच्या विकासकामांवर निशाणा

दिलीप कोळी

विटा : पालिका निवडणूकीला अजून एक वर्षाचा अवधी असला तरी आतापासूनच सत्ताधाऱ्यांनी केलेल्या शहरातील व उपनगरातील निकृष्ट कामावर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. नागरीकांमध्येही निकृष्ट कामाविषयी नाराजीचा सूर उमटत आहे.

पालिका निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यात सातत्याने सामना रंगतो आहे. गेली चाळीस वर्षे पालिकेत पाटील यांची सत्ता आहे. सध्या पाटील गटाचे तेवीस तर बाबर गटाचे दोन नगरसेवक आहेत. चार वर्षात पालिका हद्दीत सत्ताधाऱ्यांनी काही विकासकामे केली आहेत. सहा महिन्यांपूर्वी काही उपनगरात रस्त्यांची कामे केली आहेत. मात्र ती निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये नाराजी आहे. गेली चाळीस वर्षे सत्ता आहे. तरीही सत्ताधाऱ्यांना शहरात मैदाने करता आली नाहीत. वर्षोनवर्षे शहरातील भुयारी गटारीचा प्रश्न जैसे थे आहे. असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. 

भविष्यात विटा शहरात भुयारी गटार योजना प्रस्तावित असल्याचे सांगत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे कॉंक्रीटीकरण न करता डांबरीकरण करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला होता. त्यावरून सत्ताधारी व विरोधकात आरोप-प्रत्यारोप झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार बाबर यांना विटा शहरात मोठ्या प्रमाणात मताधिक्‍य मिळाले.

शहरातील विकासकामांसाठी आमदार बाबरही निधी मंजूर करून आणत आहेत. त्यातही सत्ताधा-यांकडून सहकार्य मिळत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. नुकतेच श्री. बाबर यांनी पालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यांसाठी बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्याचा सत्ताधा-यांनी खुल्या मनाने स्वीकार करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 साठी पालिका सध्या आघाडीवर आहे. शहरातील स्वच्छता मोहिम जोमाने सुरू आहे. चित्ररूपातून श्‌हर स्वच्छता ठेवण्याचे आवाहन नागरीकांना केले जात आहे. त्यास नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सत्ताधाऱ्यांकडून शहरात होत असलेल्या विकासकामांवर विरोधकांनी लक्ष ठेवून ज्या ठिकाणी समस्या आहेत. अशा ठिकाणी आवाज उठविण्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. तरच शहराचा विकास होण्यास मदत होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT