wada
wada 
पश्चिम महाराष्ट्र

वाडा नगरपंचायत विषय समितीची निवडणूक गाजणार

सकाळवृत्तसेवा

वाडा - वाडा नगरपंचायत उपाध्यक्षासह विषय समितीच्या चार सभापतीपदांसाठी मंगळवारी (8 जानेवारी) निवडणूक होत असुन, या नगरपंचायतीमध्ये कुठल्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने ही निवडणूक पुन्हा एकदा चांगलीच गाजणार असल्याची चर्चा वाडा शहरात सुरु आहे.

वाडा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष हे पद थेट जनतेतून निवडून आले आहे. या पदावर शिवसेनेच्या गितांजली कोलेकर विराजमान असुन त्यांची मुदत अजुन दिड वर्षे बाकी आहे.मात्र उपाध्यक्षासह चार विषय समितीच्या सभापती पदाची एक वर्षाची मुदत संपल्याने या पदासाठी उद्या मंगळवारी निवडणूक होत आहे

वाडा नगरपंचायतमध्ये एकुण 17 सदस्य संख्या असून यामध्ये शिवसेना 6, भाजपा 6, काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस,बहुजन विकास आघाडी व आर.पी.आय. यांचा प्रत्येकी एक सदस्य असे संख्याबळ आहे.

नगरपंचायतीच्या पहिल्याच वर्षी काँग्रेस व आरपीआय ने शिवसेनेला पाठिंबा देऊन दोन विषय समिती सभापती पदे पदरात पाडून घेतली होती. व पुढील चार वर्षे इतर नगरसेवकांना सभापती पदाची संधी मिळावी म्हणून ठराविक कालावधीसाठी सभापती पदे देण्याच्या वाटाघाटी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार काँग्रेसला उपनगराध्यक्ष पद मिळण्याची शक्यता असुन शिक्षण समिती ही उपनगराध्यक्षांकडे आल्याने उर्वरित चार समित्यांपैकी सत्ताधारी सेनेला तीन समित्या व सहकारी पक्षांना एक समिती मिळण्याची शक्यता आहे.

तसेच या नगरपंचायतमध्ये सहा सदस्य संख्या असलेल्या भाजपानेही विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT