सातारा - पोवई नाका येथे गेल्या काही दिवसांपासून जलवाहिनीस गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
सातारा - पोवई नाका येथे गेल्या काही दिवसांपासून जलवाहिनीस गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. 
पश्चिम महाराष्ट्र

वाया जाणारे पाणी वाचविण्याचे आव्हान

सकाळवृत्तसेवा

सातारा - पावसाळा सुरू होईपर्यंत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पालिकेने शहरातील विविध पेठांमध्ये एक दिवस कपात केली आहे; परंतु दुसरीकडे पाण्याचा होणारा अपव्यय रोखण्याचे आव्हान पाणीपुरवठा विभागापुढे उभे राहिले आहे.

कास धरणाची उंची वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असताना शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यंदा शहराचे तापमान ४२ अंशावर गेलेले आहे.

बाष्पीभवनामुळे कास तलावामधील पाण्याची पातळी आठ फुटांवर पोचली आहे. नगराध्यक्षा माधवी कदम, पाणीपुरवठा समितीचे सभापती श्रीकांत आंबेकर यांनी कास तलावातील पाणी पातळीचा विचार करून शहरातील पाणीपुरवठा पावसाळा सुरू होईपर्यंत सुरळीत ठेण्यासाठी विविध भागांत आठवड्यातून एक दिवस पाणी कपात केली. त्याचे वेळापत्रक करून नागरिकांपर्यंत पोचविले. नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केल्याचे चित्र शहरात आहे. 

दरम्यान, एकीकडे पाणी वाचविण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत असताना दुसरीकडे रस्त्यांवरील जलवाहिनीच्या गळत्या, नळांना तोट्या नसणे, पाणी वाया जाण्याच्या प्रकारांकडे ना पाणीपुरवठा विभागाचे लक्ष आहे ना नागरिकांना त्याचे गांभीर्य.काही भागांत अद्यापही जलवाहिनींच्या गळत्या आहेत. या गळत्या काढल्या जातात; परंतु पुन्हा निर्माण होतात असा तक्रारींचा सूर नागरिकांचा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : कर्नाटकात दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

SCROLL FOR NEXT