Wall Painting craze increases in Solapur
Wall Painting craze increases in Solapur 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात वाढतेय वॉल पेंटिंगची क्रेझ! 

परशुराम कोकणे

सोलापूर : पिझ्झा खात बसलेला तरुणांचा समूह... मैत्रिणीसोबत सेल्फी घेणारी तरुणी... जीममध्ये व्यायाम करणारा तरुण... चटईवरून उडणारा अलादीन... यासह अनेक विषयांवरील चित्रे सोलापुरातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉपी, रुग्णालय आणि जीमच्या भिंतीवर रेखाटली जात आहेत. वॉलपेपरच्या जमान्यात वॉल पेंटिंगची क्रेझ दिसून येत आहे. 

जुन्या काळात भिंतीवरील चित्रांचे आकर्षक होते. ही परंपरा गुहा चित्रांपासून चालत आली आहे. अनेक जुन्या मंदिरांमध्येही भिंतीवरील चित्रं आजही पाहायला मिळतात. हीच कला पुन्हा एकदा लोकांना आकर्षित करीत आहे. युवा चित्रकार दया पटणे व त्याच्या सहकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांत सोलापुरात कॉफी शॉप, रुग्णालय, जीम, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये विविध विषयांवरील चित्रे रेखाटली आहेत. 

लोकांच्या मागणीनुसार कल्पकता वापरून वॉल पेंटिंग केले जात आहे. अशा प्रकारच्या चित्रांना परदेशात जास्त मागणी आहे. जनजागृतीसाठी या कलेचा वापर होतो. भित्ती चित्रे पाहण्यासाठी अनेकजण पॅरिस, युरोपमध्येही जातात. दिवसभर जॉबमध्ये अडकून पडण्यापेक्षा वॉल पेंटिंगची कामे करून लोकांना आनंद देण्यात समाधान मिळत असल्याचे, चित्रकार दया पटणे यांनी सांगितले. 

सोलापुरात वॉल पेंटिंगची क्रेझ वाढत आहे. भिंतीवर चित्र काढण्यासाठी स्क्वेअर फुटाप्रमाणे खर्च येतो. आम्ही हॉटेल, कॉफी शॉपसोबतच काही रुग्णालयात लहान मुलांना आवडतील अशी अलादीन व कार्टूनमधील पात्रांची चित्रे रेखाटली आहेत. भिंतीवरील चित्रं लोकांना आकर्षित करतात. 
- दया पटणे, युवा चित्रकार 


पाहा अधिक छायाचित्रे.. 
युवा चित्रकार दया पटणे यांनी सोलापुरातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉपी, रुग्णालय आणि जीमच्या भिंतीवर रेखाटलेली आकर्षक चित्रे पाहण्यासाठी solapur sakal च्या फेसबुक पेजला भेट द्या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT