Water supply closure for six hours for water saving at a apartment in solapur
Water supply closure for six hours for water saving at a apartment in solapur 
पश्चिम महाराष्ट्र

पाणी बचतीसाठी अपार्टमेंटला सहा तास पाणीपुरवठा बंद; रोज पाच हजार लिटरची बचत 

परशुराम कोकणे

सोलापूर  : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात अनेक भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर जुळे सोलापुरातील कोणार्कनगर येथील साई समर्थ अपार्टमेंटमध्ये पाणी बचतीचा परिणामकारक उपाय राबविण्यात येत आहे. सकाळी 11 ते सायंकाळी पाच यावेळेत अपार्टमेंटच्या टाकीतून पाणीपुरवठा बंद केला जात आहे. यामुळे रोज पाच हजार लिटर पाण्याची बचत होत आहे. 

कोणार्कनगर परिसरातील अनेक बोअर बंद झाले. मात्र, साई समर्थ अपार्टमेंटमधील बोअरला पुरेसे पाणी आहे. तरीसुद्धा शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन अपार्टमेंटने पाणी बचतीचा निर्णय घेतला आहे. इमारतीवर 25 हजार लिटरची टाकी आहे. बोअरच्या माध्यमातून ही टाकी पूर्वी दोन वेळा भरावी लागत होती. आता टाकी एकदाच भरली जात आहे. महापालिकेचे पाणीही जपून वापरले जात आहे. पाणी कमी पडत असेल तर बचत होते. सर्वांची मानसिकता बदलली आहे. सोलापूरकरांनी घरासमोर, इमारतीसमोर सडा मारणे बंद करावे, असे आवाहन साई समर्थ अपार्टमेंटचे अध्यक्ष रवी मोहिते यांनी केले आहे. 

आम्ही दुष्काळी भागातून सोलापुरात आलो आहोत. आम्ही लागेल तेवढेच पाणी वापरतो. सर्वांनी मिळून पाणी बचतीचा निर्णय घेतला आहे. सर्वांना पाणी बचतीचे महत्त्व कळाले आहे. 
- शकुंतला जोशी, रहिवासी 

आम्ही सर्वजण कमीतकमी पाणी वापरतो. आम्हाला कधीच पाण्याची कमतरता जाणवत नाही. दुष्काळावर, पाणीटंचाईवर नुसत्या गप्पा न मारता लोकांनी प्रत्यक्ष कृतीला महत्त्व द्यावे. आवश्‍यक तेवढेच पाणी वापरावे. 
- अनिता कुलकर्णी, रहिवासी 

सर्वांनाच दुष्काळाची स्थिती माहिती आहे, पण पाणी बचतीचा विचार केला जात नाही. आमच्या अपार्टमेंटमध्ये पाणी बचत केली जात असल्याचा आम्हाला अभिमान आहे. ही उपाययोजना सर्वत्र राबवावी. 
- बाबूराव जोशी, रहिवासी 

पूर्वी अपार्टमेंटच्या टाकीतून 24 तास पाणीपुरवठा व्हायचा. आता आम्ही सहा तास पाणीपुरवठा बंद करतो. यामुळे पाण्याची बचत तर होतच आहे शिवाय वीज बिल कमी येत आहे. रोज पाच हजार लिटर पाणी बचत होत आहे. 
- रवी मोहिते, अध्यक्ष, साई समर्थ अपार्टमेंट 


पूर्वी एक कार धुण्यासाठी दोन बकेट पाणी वापरले जात होते. आता दोन बकेटमध्ये चार कार स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे जवळपास 120 लिटर पाणी वाचले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT