सातारा - सातारा- पुणे- सातारा या विनावाहक विनाथांबा बसथांब्यावर शिवशाही बस भरल्यानंतरच साधी बस लावली जाते. यामुळे तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्यांना रोज प्रवाशांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.
सातारा - सातारा- पुणे- सातारा या विनावाहक विनाथांबा बसथांब्यावर शिवशाही बस भरल्यानंतरच साधी बस लावली जाते. यामुळे तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्यांना रोज प्रवाशांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. 
पश्चिम महाराष्ट्र

‘विनाथांबा’साठी स्वतंत्र खिडक्‍या करा

सकाळवृत्तसेवा

सातारा - सातारा- पुणे- सातारा या विना वाहक विना थांबा बसथांब्यावर साध्या बससाठी आणि शिवशाही या बससाठी वेगवेगळ्या तिकीट खिडकी कराव्यात व प्रवाशांचा वेळेचा अपव्यय टाळावा, अशी मागणी शेकडो प्रवाशांनी निवेदनाद्वारे विभाग नियंत्रक रवींद्र पळसुले यांच्याकडे केली आहे. 

पळसुले यांना दिलेल्या निवेदनात सातारा- पुणे- सातारा या विना वाहक, विना थांबा बसथांब्यावर साधी आणि शिवशाही बस या दोन्ही बसची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करण्यात आली आहे; पण या दोन्हीचे तिकीट एकाच खिडकीवर मिळते. एक बस पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर दुसरी बस उभी केली जाते व तिचे तिकीट दिले जाते. शिवशाही बसचा तिकीट दर साध्या बसपेक्षा जादा आहे; पण साताराहून पुण्याला नोकरी आणि शिक्षणानिमित्त दैनंदिन प्रवास करणारे शेकडो जण आहेत. अनेकांना शिवशाही बसचे तिकीट दर परवडत नाहीत.

यामुळे शिवशाही बसने ज्यांना प्रवास करायचा नाही अशांना साधी बस लागण्याची वाट पाहावी लागते. त्यानंतर साध्या बसचे तिकीट घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे काही वेळेला निश्‍चित ठिकाणी पोचण्यास विलंब होतो. त्यामुळे दोन्ही बससाठी स्वतंत्र तिकीट खिडकी करावी, तसेच साध्या बसच्या संख्येत आणि वेळेत बदल करू नये, असे नमूद करण्यात आले आहे. 

या निवेदनावर दिनकर कदम, अमोल वलेकर, सहदेव संकपाळ, रूपेश चव्हाण, साधना घोरपडे, ऋषिकेश खोमणे, दीप्ती शेंडे यांच्यासह सुमारे ७५ प्रवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT