Satara-Nagarparishad
Satara-Nagarparishad 
पश्चिम महाराष्ट्र

तीन महिलांना सभापतिपदाची संधी शक्‍य

सकाळ वृत्तसेवा

सातारा - पालिकेत नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या साथीला शहराचा कारभार सांभाळण्यासाठी तीन महिला सदस्यांची विविध विषय समित्यांच्या सभापतिपदी वर्णी लागणार आहे. त्यामध्ये सुमती खुटाळे, सविता फाळके, तसेच सुनीता पवार यांच्या नावांची चर्चा आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात महिन्यापूर्वी राजीनामा सादर करूनदेखील नव्याने निवडीचा मुहूर्त लागत नसल्याने पालिकेच्या विविध विभागांच्या विषय समितीच्या बैठकांना खो बसला आहे.

सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत विविध विषय समितीच्या सभापतींना मुदतवाढ दिली. लोकसभा निवडणूक संपताच महिन्यापूर्वी खासदार भोसले यांनी पालिका कार्यक्षेत्रात बदल करण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये स्वीकृत सदस्य, विविध विषय समितींच्या सभापतींचे, तसेच उपाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला.

त्यानंतर उपाध्यक्षपदाची, तसेच स्वीकृत सदस्यांची निवड झाली. आता सभापतिपदांच्या निवडीचे सदस्यांना वेध लागले आहेत. नव्याने संभाव्य सभापती म्हणून नियोजन समिती सुमती खुटाळे, बांधकाम समिती सविता फाळके, महिला व बाल कल्याण सुनीता पवार, आरोग्य समिती विशाल जाधव यांची नावे निश्‍चित होतील, अशी सातारा विकास आघाडीत चर्चा आहे.

दरम्यान, वृक्ष व संवर्धन समितीमधील सदस्य प्रशांत आहेरराव यांची वर्णी स्वीकृत सदस्य म्हणून झाली आहे. त्यामुळे वृक्ष समितीमध्ये नगरसेवक आहेरराव यांच्या जागेवर नव्या दमाच्या कार्यकर्त्यास संधी मिळेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT