Aruna Mali
Aruna Mali 
पश्चिम महाराष्ट्र

महिला दिन 2019 : मंगळवेढासाठी शहरवासीयाचे योगदान महत्वपूर्णः अरुणा माळी

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर): गौरवशाली महाराष्ट्रात मंगळवेढे भुमी संताची गाण्यातून स्व. प्रल्हाद शिंदे यांनी शहराचा परिचय करून दिला याच शहराला सर्वेक्षण 2018 यशस्वेनंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये कचरामुक्त शहर दर्जा मिळवताना महिला म्हणून काम करताना त्यात शहरवासीयाचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा अरूणा माळी यांनी व्यक्त केली.

थेट नगराध्यक्ष निवडीतून नगरपलिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविलेल्या नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी शहराचा दिल्लीतील नुकताच गौरव झाल्यानंतर महिला दिनानिमित्त 'सकाळ'शी बोलत होत्या त्या म्हणाल्या की, 'शहराचा प्रमुख म्हणून काम करताना समाधान व्यक्त केले. आजोळ असलेल्या शहाराच्या विकासाचे काम नागरिकाच्या सहकार्याने प्रभावीपणे केले. मुळच्या कर्नाटकातील चडचण येथे माहेर असलेल्या अरुणा माळी यांचे 10 पर्यत शिक्षण मडगाव गोवा येथे झाले, त्यानंतर 12 वी उमदी येथे झाले. घरात राजकीय वारस नसताना त्यांनी पहिल्यांदा 2006 ते 11 या कालावधीत नगरसेविका म्हणून काम केले. या कालावधीत फक्त वार्डापुरते काम करण्याची संधी असल्यामुळे नवीनच असल्याने प्रभावी काम करता आले नाही. हा कालावधी पलिकेच्या बैठकात गेल्यामुळे थेट नगराध्यक्ष निवडीत ओ.बी.सी महिला आरक्षणामुळे भारत भालके व रतनचंद शहा बॅंकेचे अध्यक्ष राहूल शहा यांनी पती सोमनाथ माळी राष्ट्रवादी कॉगे्रसचे शहराध्यक्ष म्हणून केलेले काम आणि जनसंपर्क असल्याने आपल्याला संधी दिली. आपल्यावरील कौटूबिक जबाबदारीबरोबर शहराच्या विकासाची जबाबदारी वाढली. राज्यात पक्षाची सत्ता नसल्यामुळे विकासकामाला मिळणारा निधीचा ओघ कमी असताना स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये प्रभावी काम करता आले.'

कचरामुक्त शहर करण्यात शहरवासीयाबरोबर आरोग्य विभागातील महिला, पदाधिकारी, न.पा. कर्मचारी यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले. महिलांचे प्रश्न काय असतात हे महिलेलाच माहित तरीही कौटुंबिक जबाबदारीतून शहरात काम करताना मोठे प्रयत्न केले. त्यास नागरिकानी सहकार्य केले. शहराची जबाबदारी पेलताना मुलगा नववीला तर मुलगा सहावी शिकत असून, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देताना एखादया कार्यक्रमाला जाण्याचे टाळून त्यांच्या इच्छा आंकाक्षा पुर्ण केल्या जात आहे. आ. भालके व राहूल शहा यांनी दिलेली संधी व नगरपालिकेचे अन्य पदाधिकारी व कर्मचाय्रांनी आपल्याला मदत केल्यामुळे आपण अधिक प्रभावी काम करुन शहराचा नावलौकिक देशपातळीवर नेला. यापुढील काळातही शहराला नावलौकिक मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT