The world after Corona: New gurus must be smart
The world after Corona: New gurus must be smart 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनानंतरचे जग : स्मार्ट साधणेच असतील नवे गुरू 

अजित झळके

जगात मोठे बदल घडले ते एखादी आपत्ती येऊन गेल्यानंतरच. आता कोरोनाच्या आपत्तीपासून जग लढत आहे. ही आपत्ती संपल्यानंतर किंवा ती नियंत्रणात आल्यानंतर जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल घडणार यात शंका नाही. त्याची सुरवात झालीच आहे. शेतीपासून ते शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रात नव्या दिशांचा शोध सुरू होईल. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याच्या धास्तीने भारतात पहिल्यांदाच शाळा, महाविद्यालयांच्या बहुतांश परीक्षा रद्द कराव्या लागल्या. मुलांना दीर्घकाळ सुटी जाहीर करावी लागली. पुढील शैक्षणिक वर्ष कधी सुरू होईल, याची माहिती याघडीला कुणीच खात्रीने देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याची व्यवस्था विविध संस्थांनी केली आहे. त्यात इंग्रजी माध्यम शाळांपासून ते जिल्हा परिषद शाळांपर्यंत साऱ्यांचा समावेश आहे. एवढेच काय प्रवेश प्रक्रियाही ऑनलाईन पद्धतीनेच सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांनी तर ऑनलाईन परीक्षा घेतल्या. अनेक खासगी शिकवण्या चालकांनी व्हिडिओ शूटिंगद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. स्पर्धा परीक्षांचे अनेक लेक्‍चर झूमद्वारे झाले आहेत. काही काळात या स्मार्ट फोन, टीव्ही, ऍपचा वापर कसा करावा, याचे अधिकृत शिक्षणच अभ्यासक्रमात समाविष्ट झालेले असेल. त्याचा काहीभाग सध्या अभ्यासक्रमात आहे. 

ग्रामीण शिक्षण व्यवस्था सुधारेल 

प्राथमिक शिक्षण पद्धतीत मोठे बदल अपेक्षित आहेत. ग्रामीण भागातील शिक्षण पद्धती अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण करून शहरातील गर्दी कमी व्हावी, यासाठी लोकच स्वतः बदल करून घेतली. जेणेकरून शिक्षणासाठी गर्दीच्या शहरात रहायला नको, अशी भूमिका घेतली जाईल, असे चित्र समोर येत आहे. ग्रामीण आणि शहरी शिक्षण कनेक्‍टिव्हिटी वाढवणे शक्‍य आहे. त्यासाठी दोन्हीकडील शिकवणाऱ्यांचा टायअप होईल आणि गावात बसून विद्यार्थ्यांना शहरी शिक्षण पद्धतीचा लाभ होईल. सुरवातीला ही पद्धत महाग वाटेल, मात्र वापर वाढेल, तशी ही पद्धत रुजणार आहे. 

पुढील काही काळासाठी तरी... 

  • एका बेंचवर एक मुलगा असे नियम येतील 
  • एखादा मुलगा आजारी पडला तर वर्ग क्वारंटाईन होईल 
  • एखाद्याच्या संपर्कातील व्यक्तीस लागण झाली तरी वर्ग विस्कळित होईल 
  • विद्यार्थी मास्क वापरूनच वर्गात बसतील 
  • वर्गाबाहेर सॅनिटायझरची सक्ती होईल 
  • शाळेत, शिकवणीत येताना पाय धुवावे लागतील 
  • स्वच्छतेची शिस्त लागेल, त्यासाठी वेगळी सक्ती नसेल 

हे बदल घडतील 

  • ऑनलाईनला पूरक अभ्यासक्रम तयार होतील 
  • मोबाईल हा दप्तरातील महत्त्वाचा घटक असेल 
  • मोबाईल रेंज हा प्रॉब्लेम आहे. ती सुधरावी लागेल 
  • मोबाईल रिचार्जचा पॉकेटमनी वाढेल 
  • अकरावीपासून मुलांकडे स्मार्ट फोन वापर सुरू होईल 
  • शिक्षकांना व्हिडिओग्राफीची कला शिकावी लागेल 
  • नवे वेबसाईट आकाराला येतील 
  • स्मार्ट टीव्हीचा शैक्षणिक कार्यातील सहभाग वाढेल 

डिस्टन्स एज्युकेशन 
दूरशिक्षण पद्धती ही नवी नाही. भारतात ती फार यशस्वी झालेली नसली तरी ती सुरू आहे. ती आता अधिक प्रभावी झालेली दिसेल. विशेषतः काही विशिष्ट शाखांमधील शिक्षण हे जिल्हा पातळीवरही दूर शिक्षण पद्धतीने दिले जाऊ शकेल. काही महत्त्वाच्या गोष्टी ऑनलाईन, झूम ऍपवर, वॉटस्‌ऍपवर शिकवल्या जाऊ शकतील. 

स्मार्ट क्‍लासरूम 
डिजिटल स्मार्ट क्‍लासरूम ही संकल्पना आता बहुतांश शाळांमध्ये सुरू झाली आहे. ती आता वेगवान होईल. त्यासाठीची गुंतवणूक वाढवावी लागेल. जेणेकरून तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन बसल्या जागी विद्यार्थ्यांना मिळू शकेल. त्यासाठी फार पगारही मोजावा लागणार नाही आणि कमी गुणवत्तेमुळे मागे पडणाऱ्या शाळांना बुस्टर देता येईल. 

ही सपोर्टिंग शिक्षण पद्धती म्हणून उपयोगात येऊ शकेल

ऑनलाईन पद्धतीने शिक्षणावर सध्या भर आहे. दुसरा पर्याय नाही. ही पद्धत प्रभावी ठरते आहे. ती शंभर टक्के वापरता येणार नसली तरी पुढे किमान 50 टक्के वापर अशा पद्धतीने केला जाऊ शकतो. ही सपोर्टिंग शिक्षण पद्धती म्हणून उपयोगात येऊ शकेल. हजारो विद्यार्थ्यांपर्यंत सहज गुणवत्तापूर्ण शिक्षण नेता येईल, हे या संकट काळाने दाखवून दिले आहे.
- आर. बी. शिंदे, शिक्षण तज्ज्ञ

नवा गुरू म्हणून स्मार्ट साधनांचा वापर
मुलांनी मोबाईल घेतला की पालक चिडायचे. आता तसे चालणार नाही. मोबाईलचा वापर कसा करावा, यावर आठवीतच धडा आला आहे. वर्गात मोबाईलसह शिक्षण अधिक सुलभ होणार आहे. लाईव्ह पद्धतीने शिकणे उत्तमच, मात्र आता पद्धत बदलावी लागेल. शिक्षणाचा नवा गुरू म्हणून स्मार्ट साधनांचा वापर केला जाईल. गुगल आणि यू-ट्यूब हे विद्यार्थ्यांचे नवे मित्र असतील.
- एम. एस. रजपूत, शिक्षण तज्ज्ञ 

अनेक नवे ऍप तयार होतील

जिल्हा परिषदेच्या शाळा आधुनिक होत आहेत. त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अधिकाधिक वापर आम्ही करत आहोत. कोरोना सुरू होण्याआधी त्याची सुरवात झाली, आता ते अधिक गतीने व गांभीर्याने या पद्धतीला रुजवले जाईल. त्यासाठी अनेक नवे ऍप तयार होतील. आमचे शिक्षक यू-ट्यूबच्या माध्यमातून शिक्षण पद्धती दूरपर्यंत पोहोचवतील.
- सुनंदा वाखारे, शिक्षणाधिकारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT