पश्चिम महाराष्ट्र

#worldfamilyday व्हिडिओ कॉलच ठरतो कुटुंबाला जोडणारा दुवा

सुधाकर काशिद

कोल्हापूर - मुलगा, सून व नातवंडे नोकरीनिमित्त परदेशात. इकडे कोल्हापुरात फक्त आई-बाबा. बदलत्या जगानुसार हा बदल अनेक आई-बाबांनी मान्य केला. पण, मुले व नातवंडांशी संवादाची ओढ अतूट आहे. या परिस्थितीत अनेक कुटुंबांत व्हॉट्‌सॲप व्हिडिओ कॉल हा कुटुंबांना काही कारणासाठी समोरासमोर आणण्याचा एक मार्ग झाला. एकत्र कुटुंब असले पाहिजे, ही संकल्पना चांगली आहे. पण, बदलत्या परिस्थितीत ही संकल्पना मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये सामावलेली दिसते. अर्थात, काही कामासाठी एकमेकांशी होणारे हे दर्शन व होणारा हा संवाद खूप मोलाचा ठरतो आहे.

महावीर महाविद्यालयाजवळ गुंडाप्पा रामचंद्र शिंदे व त्यांच्या पत्नी छाया राहतात. त्यांचे मोठे पुत्र अभिजित शिकागोत, तर दुसरे पुत्र प्रताप टोपेका येथे. अभिजित यांच्याबरोबर पत्नी नीता व नातू अथर्व, तर प्रताप यांच्याबरोबर पत्नी अर्चना व नात सावी राहतात. इथे कोल्हापुरात शिंदे काका-काकी असतात. दोन्ही मुलगे तिथे चांगल्या नोकरीला, याचे त्यांना जरूर समाधान आहे. पण, समोर मुलगे, सुना व गोड नातवंडे नसणे ही 
काळजाला कोठेतरी खुपणारी सल कायम जीवंत आहे. त्यामुळे रोज ते तिकडे अमेरिकेतील व इकडे भारतातील वेळ जुळवून सकाळी आठला व्हिडिओ कॉल करतात. एकमेकांशी समोरासमोर संवाद साधतात.

शिंदे काका-काकी नातवांचे कौतुक करतात. या काळात ते इतर सारे जग विसरून जातात. ठराविक वेळेनंतर मोबाईल बंद करतात. जणू नोकरीच्या निमित्ताने विखुरलेले कुटुंबच त्या मोबाईलमध्ये बंद करून ठेवतात. 

असेच कुटुंब राजू जोशी यांचे आहे. ते राजारामपुरी १४ व्या गल्लीत राहतात. त्यांचे मोठे पुत्र अभिषेक शारजात क्रिसेंट ऑईल कंपनीत नोकरीला. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी शर्मिला, विवान व आर्वी ही नातवंडे राहतात. दुसरे पुत्र आदित्य मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे. ते मेट्रो ट्रेन तयार करणाऱ्या बंबार्डियर कंपनीत नोकरीला. त्यांच्याबरोबर पत्नी अपूर्वा राहतात. या दोन मुलांशी राजू व संध्या जोशी व्हॉट्‌सॲपवरून संवाद साधतात. एक पुत्र अभिषेक शारजात. त्यांना विवान व आर्वी ही मुले. या नातवांशी ते व्हॉट्‌सॲप कॉलवरून बोलतात. दुसरे पुत्र मेलबर्नला. त्यांच्या आणि इथल्या वेळेत साडेपाच तासांचे अंतर. त्यामुळे दोघांच्या सोयीची वेळ निवडतात आणि एकमेकांशी संवाद साधतात. या वेळी राजू व संध्या जोशी या दोघांचेही शब्द काही काळासाठी बोबडे होऊन जातात.  

ओढ कायम
परदेशात नोकरीला असलेली मुले रोज फोनवर बोलतात, हे खरे आहे. पण, फोन लागण्यापूर्वी व फोन ठेवल्यानंतर एक ओढ कायम असते. फोनवर कितीही बोलले तरीही ओढ वाढतच जाते. एवढा मात्र आधार की व्हॉट्‌सॲपवरून नोकरीनिमित्त विखुरलेले कुटुंब काही काळासाठी एकत्र येते. आणि दिसवभरात या क्षणाकडे लक्ष लागून राहिलेले असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT