पश्चिम महाराष्ट्र

यशवंत बँक लुट प्रकरणः वैभववाडीजवळ घाटात मृतदेहाचा शोध

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - बॅंक लुटीच्या प्रकरणातून बेपत्ता भैरवप्रसाद ऊर्फ सुनील पाटील यांच्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला. मारेकऱ्यांनी त्यांना मद्यातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर भोसकून खून करून मृतदेह वैभववाडी परिसरातील घाटात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.

त्यानुसार मृतदेहाच्या शोधाचे काम सुरू झाले. खुनानंतर संशयित विजय गौडच्या संपर्कात एक महिला आली. त्याचा खुनाशी काही संबंध आहे काय, याचा तपास सुरू आहे. दरम्यान महिलेची पोलिसांनी कसून चौकशी केली. गुन्ह्यातील संशयितांची संख्या वाढण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.
यशवंत बॅंक लुटीचा छडा काल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लावला. याप्रकरणी संशयित विजय रामचंद्र गौड (वय २८) व राजू नेताजी सातपुते (२८) यांना अटक केली.

चौकशीत त्यांच्याकडून जानेवारी २०१४ मध्ये कळंबा परिसरातून बेपत्ता झालेल्या भैरवप्रसाद ऊर्फ सुनील पाटीलच्या खुनाचा छडा लागला. दोघांनी अक्षय ऊर्फ आकाश दाभाडेच्या मदतीने भैरवप्रसाद याचा खून केल्याची कबुली दिली. अक्षय पसार झाला आहे. दरम्यान, दोघांना आज न्यायालयाने सोमवार (ता. १०) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

संशयित विजय व राजू व अक्षय यांनी भैरवप्रसादचा खून करून मृतदेह वैभववाडीजवळील घाटात फेकून दिल्याची माहिती पुढे आली. मात्र पाच वर्षे लोटल्याने त्याचे अवशेष शोधण्याचे आव्हान आहे. दरम्यान, खुनाचा प्रकार घडल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत संशयित विजय गौड याच्या संपर्कात महिला आल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे हा खून पैसे की प्रेमसंबंधातून झाला याबाबत साशंकता आहे. संबंधित महिलेची आज पोलिसांनी चौकशी केली. गुन्ह्यातील संशयितांची संख्या वाढण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

नातेवाइकांचा जबाब
आज मृत भैरवप्रसाद यांच्या भावासह दोघा नातेवाइकांचे जबाब स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नोंदविले आहेत. दरम्यान, लूट प्रकरणी संशयितांनी वापरलेले हेल्मेट, रूमाल, वाहन जप्त केले. त्यांच्याकडून सुरा व पिस्तूल जप्त करण्याचे काम सुरू आहे; मात्र हे पिस्तूल नसून ती एअर गन असल्याचा दावा करवीर पोलिसांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT