solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

थकलेल्या अंध आजोबांना युवकाने दिला आधार 

परशुराम कोकणे

सोलापूर : थकलेल्या शरीराने तळपत्या उन्हात रस्त्यावर पडलेल्या 85 वर्षीय अंध आजोबाला युवकाने मदतीचा हात दिला. घराचा पत्ता शोधला, पण घरी देखभाल करण्यास कोणीच नसल्याने बाळीवेस परिसरातील श्री मल्लिकार्जुन मंदिरात त्यांना सोडले. 

सामाजिक कार्यकर्ता हर्षल प्रधाने हे मंगळवारी सकाळी घरातून निघाले. सकाळी अकराच्या सुमारास सरस्वती चौकात 85 वर्षाचे विश्‍वनाथ आहेरवाडी (रा. बाळीवेस परिसर, सोलापूर) हे उन्हात पडून होते. आजोबांना पाहताच हर्षल यांनी आपली कार थांबविली. जवळ जाऊन त्यांची विचारपूस केली. "बाळा मी दोन्ही डोळ्यांनी अंध आहे असे सांगून त्यांनी पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर हर्षल यांनी आजोबांना कारमध्ये बसवले. प्राथमिक चौकशी केली. त्यांना 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे, पण ते आजोबांना संभाळत नसल्याचे समजले. आजोबांची कहाणी ऐकून हर्षल यांचे मन सुन्न झाले. 

हर्षल यांनी स्माईल प्लस फाउंडेशनचे योगेश मालखरे यांच्याशी संपर्क केला. सर्व घटना सांगितली. मालखरे यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात जावून मदत घेण्याचे सुचविले. फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर हर्षल यांना मदत मिळण्याऐवजी दुसऱ्याच प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यामुळे ते आजोबांना घेऊन तेथून निघाले. हॉटेलमध्ये नेवून जेवण खाऊ घातले. थोड्यावेळाने परत मालखरे यांचा फोन आला. मालखरे यांनी "सकाळ'च्या प्रतिनिधीची भेट घेण्यास सुचविले. त्यानंतर काही वेळातच आजोबांचा पत्ता शोधून काढला. अंध आजोबांनी बॅंकेत घेवून जाण्याचा आग्रह केला. हर्षल यांनी आजोबांना बॅंकेत नेले. तिथे पेन्शनचे एक हजार रुपये काढून आजोबांना दिले. त्यानंतर आजोबांना बाळीवेस येथील घरी नेले. घरी कोणीच नसल्याने शेजाऱ्यांना सांगून आजोबांना मल्लीकार्जुन मंदिरात सोडले. 

आजोंबाना घराकडे नेवून सोडले खरे पण या घटनेने मन अवस्थ झाले आहे. त्यांना दोन मुले व परिवार असूनही या अवस्थेत भटकावे लागत आहे. त्यांची देखभाल करण्यासाठी कोणीच नाही. माझ्यापरीने जमेल तेवढी मदत मी केली आहे. अशा निराधारांचा सांभाळ करण्यासाठी शासनाकडून व्यवस्था असणे आवश्‍यक आहे. 
- हर्षल प्रधाने, सामाजिक कार्यकर्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT