Antyodaya ration card holders get sugar for last three months pimpri
Antyodaya ration card holders get sugar for last three months pimpri esakal
पिंपरी-चिंचवड

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना गेल्या तीन महिन्यांची मिळणार साखर!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शहरातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना गेल्या तीन महिन्यांपासून साखर मिळालेली नव्हती. ती आता प्रतिमहिना एक किलो प्रमाणे प्रतिकुटुंब तीन किलो साखर देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची ईद अधिक गोड होणार आहे. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना रेशनवरील साखर बंद केली आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानातून दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येते.

मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानदारांना साखरच मिळत नाही. शासनाकडून जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २०२२ या तीन महिन्यात साखरेचा पुरवठा झाला नाही. किरकोळ बाजारात साखरेचे दर सध्या वाढले आहेत. एक किलो साखर ३६ ते ३८ रुपयांना मिळत आहे. रेशन दुकानात मात्र अंत्योदय गटातील कुटुंबांना वीस रुपये किलो दराने साखर मिळणार आहे. आता शासनाकडून या तीन महिन्यासाठीची साखर उपल्बध झाली आहे. ती पुरवण्याची जबाबदारी शिधापत्रिका कार्यालयांना दिली आहे. सर्व अंत्योदय लाभार्थ्यांनी स्‍वस्त धान्य दुकानातून तीन महिन्याच्या साखरेची उचल करावी. जर रास्तभाव दुकानदारांनी अंत्योदय लाभार्थ्यांस एखादा महिना कमी साखर दिली, तर तक्रार करावी, अशा सुचना देखील करण्यात आल्या आहेत. रेशन दुकानातून गायब झालेली साखर केवळ सणानिमित्ताने मिळत असल्याने काही अंशी समाधान व्‍यक्‍त होत आहे. रमजान ईद सणात साखर मिळणार असल्याने नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

नागरिकांची अपेक्षा...

अंत्योदय योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना वितरीत करावयाची प्रतिकुटुंब एक किलोग्रॅम साखर वेळेत स्वस्त धान्य दुकानामधये मिळते. पण कमीत कमी पाच किलो एका शिधापत्रिकेवर देण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

‘साखरेची मागणी करा’

सर्व अंत्योदय कार्डधारकांनी दुकानदारांकडे साखरेची मागणी करून साखर प्राप्त करून घ्यावी व त्याबद्दल रीतसर पावती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. राज्य सरकारने बऱ्याच दिवसांनंतर रेशनवर साखरेची व्यवस्था केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT