1crime_33
1crime_33 
पिंपरी-चिंचवड

थेरगावमध्ये तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार करीत मारहाण करून ऐवज लुटल्याची घटना थेरगाव येथे घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात सात जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. (Case filed for assault on transgender in Pimpri)

याप्रकरणी एका तृतीय पंथी व्यक्तीने फिर्याद दिली आहे. रुक्सार उर्फ इरफान इन्साफ खान, आजम शेख (दोघेही रा. गोवंडी इस्ट, मुबई), अनम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), सिमरन उर्फ पवन (पूर्ण नाव माहीत नाही, रा. गोवंडी इस्ट, मुंबई) व तीन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आराेपी आजम शेख हा आरोपी रुक्सार खान हिचा पती आहे. तसेच रुक्सार खानसह इतर आरोपी व फिर्यादी हे तृतीय पंथी आहेत. एकमेकांचे गट सोडून आल्याने त्यांच्यात वाद आहे. आरोपी रुक्सार खान ही फिर्यादीची पूर्वीची गुरू आहे.

आरोपींनी फिर्यादी व तिच्या मैत्रिणीला चाॅपर उलटा मारून जखमी केले. तसेच फिर्यादी व तिच्या मैत्रिणीकडील मोबाईल तसेच फिर्यादीकडील तीस हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच आरोपी आजम याने फिर्यादीच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT