Sharad Pawar
Sharad Pawar esakal
पिंपरी-चिंचवड

चिंचवड, भोसरीच्या आमदारांनी दुकान नव्हे मॉल थाटलेत

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील भाजपच्या दोन आमदारांनी पिंपरी-चिंचवड शहर वाटून घेत दुकानदारी न करता थेट मॉल थाटले आहेत, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला. पवार यांनी निगडीतील दुर्गानगर चौकातील येथील एका हॉलमध्ये आजी- माजी नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेतली. यामध्ये सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर ते बोलत होते. यावेळी १७० माजी नगरसेवक उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘पूर्वी सर्वाना विश्वासात घेतले जायचे. यातूनच शहराचा विकास साधला. मात्र, सध्याच्या दोन्ही आमदारांनी शहर वाटून घेतले. ही तुझी बाजू, ही माझी बाजू अशी स्थती आहे. त्यामुळे शहराच्या विकासावर परिणाम होतो''.

‘‘आजी-माजी नगरसेवकांनी जोमाने कामाला लागावे. हार मानू नका, शहराच्या विकासात तुमचा सिंहाचा वाट आहे. पक्षाशी एकनिष्ठ रहा. जय-पराजय पचवायची ताकद लागते. तुमच्या कामांमुळेच शहराचा झाला आहे’’, असेही आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, माजी नगरसेवकांनीही आपली मते मांडली . शहरात पक्षात शहरात नात्या-गोत्यांचे राजकारण चालते. त्यामुळेच मावळ लोकसभा मतदारसंघातून तीनही वेळा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. तीच बाब महापालिका निवडणुकीत होऊ नये. यासाठी आपण लक्ष घालावे.

यावेळी माजी नगरसेवक तानाजी खाडे, पंडित गवळी, शंकर पांढरकर, श्याम वाल्हेकर, महंमदभाई पानसरे, जगदीश शेट्टी, किरण मोटे, विनायक रणसुभे, नगरसेविका शमिम पठाण आदी माजी नगरसेवकांनी आपली मते मांडली .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT