शहरातील काही नागरिक गाडीवर कुलर घेऊन जातानाचे दृश्य दिसत आहे.
शहरातील काही नागरिक गाडीवर कुलर घेऊन जातानाचे दृश्य दिसत आहे. 
पिंपरी-चिंचवड

Video : दुकाने सुरू; कुलर, एसी विक्रीला वेग

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहराचा पारा ४० अंशावर पोचला आहे. परिणामी दुपारी झळा बसू लागल्याने घरात बसणे कठीण झाले आहे. तसेच लॉकडाउनमुळे कुलर, एसी, पंखे आदींची खरेदी करता येत नव्हती. मात्र, नव्या मार्गदशक सूचनांनुसार इलेक्‍ट्रिकल्स दुकाने उघडल्याने रोज किमान ५० पंखे, कुलरची विक्री होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दीड महिन्यापासून लॉकडाऊनची अंमलबजावणी केली आहे. एकीकडे घरात राहण्याशिवाय पर्याय नसताना दुसरीकडे तापमानाचा पारा वाढत आहे. दीड महिन्यापूर्वी कुलर व पंखे आणि इतर साहित्याची खरेदी करता येत नाही. अथवा काही बिघाड असल्यास कारागीरसुद्धा घरी येत नसल्याने अडचणींमध्ये वाढ झाली होती. उकाडा जाणवत असल्याने नागरीकांचे हाल झाले. पण आता दुकाने उघडल्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार, खिडकी व खोलीत ठेवण्यासाठी दोन ते पाच फुटांपर्यंत कुलर उपलब्ध आहेत. सध्या स्टेनलेस स्टीलच्या कुलरला पसंती दिली जात आहे. सोशल डिस्टिंगचे नियम पाळूनच ग्राहकांना दुकान पाठविले जात आहेत. त्यांची थर्मलने गन शारिरिक तापमान तपासूनच खरेदीसाठी सोडण्यात येत आहे.

हजारो तरुणांना रोजगार
साधारण मार्चपासून कुलर्स, एसी, फ्रिज विक्रीत तेजी येते. ब्रॅन्डेड कुलर्स विक्रीसह, त्यांची देखभाल-दुरुस्ती, मोठे कुलर्स भाड्याने देणे याचा व्यवसायही तेजीत असतो. मार्च ते जून असे चार महिने हा व्यवसाय चांगला चालतो. या माध्यमातून शहरात शेकडो तरुणांना रोजगारही मिळतो. परंतू यावर्षी कोरोनामुळे जवळपास दोन हजार तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागला.

१५....................... होलसेल कुलर विक्रेते (सध्या उघडी असलेली दुकाने)
५० ....................... कुलरची दिवसाला विक्री
२०००........................ एका होलसेलरकडील विक्री (संपूर्ण सीझन)
३००० ते ७५००हजार रुपये......डेझर्ट कूलरची किंमत.

दीड महिन्यापासून उकाड्याने त्रस्त झालो. आता नव्या मार्गदशक सुचनांनुसार इलेक्‍ट्रिक दुकाने उघडली आहेत. आम्ही तात्काळ कुलर खरेदी केला आहे.
- समीर चौरे, ग्राहक चिंचवडगाव

व्यवसायावर परिणाम
उन्हाळ्यामध्ये कुलर, फ्रीज, पंखे, एसी अशा उपकरणांना मोठी मागणी असते. दरवर्षी या दोन महिन्यात खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. पण लॉकडाऊनमुळे परंतु दुकानेच बंद असून विक्रेत्यांना मोठा फटका सहन करावा लागला. तर किरकोळ दुरुस्तीची कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या व्यवसायावरही बेरोजगारीचे संकट कोसळले होते, असे विक्रेते सुरज कुमार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराट आऊट, पण फाफ डू प्लेसिसचा चेन्नईला अर्धशतकी दणका

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT