पिंपरी-चिंचवड

VIDEO : 'पीसीएमसी रनर्स'च्या दैनंदिन सरावाला सुरुवात; कसा करतात सराव पाहा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : नियमित शारीरिक तंदुरुस्ती ठेवून विविध देशी-विदेशी मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या पीसीएमसी रनर्सच्या हौशी धावपटूंनी दैनंदिन व्यायाम आणि सरावाला हळूहळू सुरुवात केली आहे. दक्षिण अफ्रिकेतील कॉम्रेडस्‌ अल्ट्रा मॅरेथॉनची वर्षपूर्ती मॅरेथॉन धावपटूंनी केक कापून साजरी केली. 

शहर परिसरात 'पीसीएमसी रनर्स' हा धावपटूंचा समूह कार्यरत असून, या समूहामार्फत हौशी धावपटूंसाठी चिंचवडगाव, निगडी, वाकड, पिंपळे सौदागर आणि स्पाईन रोड सर्कल येथे सदस्यांसाठी स्ट्रेंग्थ ट्रेनिंग आणि योगासनांचा विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. मात्र, लॉकडाउनमुळे हे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम बंद आहेत. सध्या धावणे यासारख्या वैयक्तिक व्यायाम प्रकारांना महापालिकेने मुभा दिली आहे. त्यादृष्टीने, हौशी धावपटूंनी घराबाहेर पडून दैनंदिन शारीरिक तंदुरुस्ती टिकविण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. 

अल्ट्रा मॅरेथॉनपटू चंद्रकांत पाटील म्हणाले, "यापूर्वीच्या लॉकडाउनच्या काळात पीसीएमसी रनर्सचे बहुतेक सदस्य घरी राहूनच स्वतःची तंदुरुस्ती टिकवून ठेवत होते. सूर्यनमस्कार, एव्हरेस्ट चॅलेंज, पुशअप्स आदी व्यायाम प्रकार केले जात होते. मात्र, आता काही धावपटूंनी त्यांच्या नियमित व्यायामाला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी 9 जूनलाच आमच्यातील काही धावपटूंनी दक्षिण अफ्रिकेतील कॉम्रेडस्‌ अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली होती. त्या शर्यतीच्या वर्षपूर्तीची आठवण म्हणून आम्ही केक कापला. सध्या कोणत्याही स्पर्धा चालू नाहीत. त्यामुळे दैनंदिन तंदुरुस्ती राखण्यावर मी भर देणार आहे.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अल्ट्रा धावपटू भूषण तारक म्हणाले, "घरात राहून स्ट्रेंग्थ ट्रेनिंग करताना मी 300 बैठकांपासून सुरुवात केली. आता साडेतीन हजार बैठका मारत आहेत. 5 हजारांपर्यंत बैठका मारण्याचा माझे लक्ष्य आहे. आता नियमित सरावही चालू केला असून कॉम्रेडस्‌ मॅरेथॉनसमवेत चांगल्या आठवणी आणि भावना जोडल्या गेल्या आहेत.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पीसीएमसी रनर्स या समूहाशी सुमारे अडीचशेहून अधिक धावपटू जोडले गेले आहेत. त्यातील काही धावपटूंनी न्यूयॉर्क, बोस्टन, बर्लिन, टोकियो, लंडन, शिकागो, लडाख अल्ट्रा यासारख्या नामवंत मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT