जुनी सांगवी - येथे कामासाठी मजुरांची नाक्यावर होणारी गर्दी.
जुनी सांगवी - येथे कामासाठी मजुरांची नाक्यावर होणारी गर्दी. 
पिंपरी-चिंचवड

पोटाच्या खळगीपुढे संसर्गाची भीती धूसर

रमेश मोरे

जुनी सांगवी - दररोजच्या रोजंदारीवर पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर चौकात गर्दी करून उभे होते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चेहऱ्यावर चिंतेच्या आठ्या तर होत्या. परंतु त्यापेक्षाही रोजगारासाठी कोरोनासी दोन हात करण्याची उमेद त्यांच्या देहबोलीतून अधिकच ठळक दिसत होती. सध्याच्या संघर्षमय जीवनाला सामोरे जाताना जगण्यसाठीची धडपड अधोरेखित होत होती. हे चित्र होते जुनी सांगवीतील मजूर अड्ड्याचे. गेल्या वर्षभरापासून सर्वच स्तरातील आर्थिक घडी कोरोनामुळे विस्कटली आहे. मध्यंतरी काही महिने दिलासादायक गेल्यानंतर पुन्हा कोरोना संसर्गाने डोकेवर काढले आहे. यामुळे पुन्हा मागील परिस्थिती ‘नको रे बाबा’, असा सूर ऐकायला मिळत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कामासाठी दाही दिशा
बांधकाम व्यवसाय व इतर कामातही नेहमीसारखी गती नसल्याने जुनी सांगवी मजूर नाक्यावर कामाच्या शोधात सकाळपासून गर्दी करीत आहेत. लग्न समारंभावरील निर्बंधांमुळे या संबंधित असणारी कामांना बगल दिल्याने अशा कामगारांवर मजूर नाक्याचा आधार घ्यावा लागत आहे.

दुरुस्तीची कामे ठप्प
बांधकाम क्षेत्राला म्हणावी तशी गती नसल्याने तर मागील दिवस पुढे पुन्हा येऊ नये ,यासाठी मजुरांची अधिक जमापुंजी जमविण्यासाठी या महिन्यांमध्ये कसरत सुरू आहे.

रंगारींचा अद्याप ‘बेरंगच’
कोरोनानंतर काही महिने दिलासादायक गेल्यानंतर पुन्हा रंगकामे, घरगुती दुरुस्ती कामे यावर होणाऱ्या खर्चिक कामांना नागरिकांनी हात आखडता घेत आहे. पूर्वीसारखी रंगाची कामे मजूरांना मिळत नाही. त्यामुळे दिवाळी, दसरा जेमतेमच गेला. पुन्हा परिस्थिती सुधारेल, असे वाटले. मात्र, त्या गतीने कामे सुरू होत नसल्याने कामे शोधावी लागत असल्याचे मुरलीधर देवरे यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT