पिंपरी-चिंचवड

अन्न-पाण्याच्या शोधात ते मानवी वस्तीत आलं, पण कुत्र्यांनी...

सकाळ वृत्तसेवा

कामशेत (ता. मावळ) : अन्न- पाण्याच्या शोधासाठी डोंगरातून मानवी वस्तीत आलेल्या भेकराचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. प्राणीमित्रांनी या भेकराला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अपयश आले. तीन वर्षाचे नर जातीचे हे भेकर होते. या भेकराला प्राणीमित्र असलेल्या बाप-लेकांनी वाचण्याचा केलेला प्रयत्न निर्थक ठरला. 

शुक्रवारी (ता. 3) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गाजवळील वीकेडर सोसायटीच्या मागे कुसगावच्या डोंगरातून हे भेकर आले होते. अन्न आणि पाण्यासाठी या डोंगरातून भेकर येण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आज सकाळी आलेले भेकर संतोष राक्षे आणि सिद्धेश राक्षे यांनी पाहिले. शहरातील मोकाट कुत्री या भेकराचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला करीत होते. हे पाहून राक्षे पिता-पुत्रांनी कुत्र्यांना हाकलून लावले. भेकराला पाणी पाजले. तसेच, वन्यजीव रक्षक समितीचे सदस्य अनिल आंद्रे यांना बोलवले. त्यानंतर त्यांनी जखमी भेकराबाबत वनविभागाला कळविले. वनविभागाचे परिमंडळ अधिकारी मंगेश सपकाळे, वनरक्षक शीतल मेरघळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमी भेकराला ताब्यात घेऊन उपचारासाठी वडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. पशुधन विकास अधिकारी भोसले यांनी तपासणी केली असता ते मृत झाल्याचे सांगितले. मृत भेकराचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वनपरिमंडळ अधिकारी वैभव सपकाळे म्हणाले, की वन्यजीव रक्षक समितीच्या सदस्यांनी माहिती दिल्यावर घटनास्थळी पोहोचलो. जखमी भेकराला वडगाव येथे आणले मात्र, त्याची तपासणी केली असता भेकर घाबरून किंवा भेदरून मृत झाल्याचा अहवाल पशुधन विकास अधिकारी यांनी दिला. संतोष राक्षे म्हणाले, की या परिसरात मोकाट भटकणाऱ्या  कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करावा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT