Ganesh Jambhulkar elected as Sarpanch of IT for second time by majority hinjewadi politics Sakal
पिंपरी-चिंचवड

Pune News : निवडणूक प्रक्रियेत विरोधकांचा व्यत्यय; हिंजवडीच्या राजकारणात गुवाहटीचा प्रत्येय!

आयटीच्या सरपंचपदी गणेश जांभूळकर यांची दुसऱ्यांदा बहुमताने निवड

सकाळ वृत्तसेवा

- बेलाजी पात्रे

हिंजवडी : आयटी नगरी हिंजवडीची खुर्ची ताब्यात ठेवण्यासाठी महिन्याभरापासून गाव कारभाऱ्यात सुरू असलेली चुरस व डाव- प्रतिडावांना अखेर पूर्ण विराम मिळाला. तणावपूर्ण वातावरणात सरपंचपदाची निवडणुक प्रक्रिया पार पडली. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अखेर गणेश जांभूळकर यांनी ९ विरुद्ध ७ आशा मताधिक्याने बाजी मारत पंचवार्षिकमध्ये दुसऱ्यांदा सरपंचपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळवला.

उपस्थित १६ सदस्यांमध्ये गुप्त मतदान घेण्यात आले. यात गणेश जांभुळकर यांना ९ तर मयूर साखरे यांना ७ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हेमंत नायकवडी यांनी तर सहायक म्हणून प्रभारी ग्रामविकास अधिकारी बी.आर.पाटील व तलाठी सागर शेलार यांनी कामकाज पाहिले.

सरपंचपदासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठी चुरस असताना अनेक शह-कटाशहानंतर सत्ताधारी ग्रामदैवत श्री म्हातोबा परिवर्तन पॅनेलने सरपंचपद राखले. त्यामुळे ग्रामदैवत म्हातोबा देवाचा कौल सत्यालाच मिळाल्याची भावना विजयी पॅनलमधील ज्येष्ठांनी व्यक्त केली.

निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सरपंच व सत्ताधारी सदस्यांचे अभिनंदन करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय आवारात मोठी गर्दी झाली होती. माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश निकाळजे, काँग्रेसचे नेते दिलीप हुलावळे, माजी संचालक वसंत साखरे, माजी उपसरपंच तानाजी हुलावळे, हिरामण साखरे, गणेश बोरकर, सुरज जांभुळकर, दत्तामामा वाकळे, बाळासाहेब पिंजन, उमेश साखरे, प्रवीण जांभुळकर, कृष्णा बुचडे, श्रीकांत नवले, यशवंत साखरे, कुंडलिक जांभुळकर, निलेश जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात..!

सरपंचपदाच्या निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंजवडी पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कुणालाही सभागृहात प्रवेश न देता सर्वांनाच बाहेर रोखण्यात आले होते.

दरम्यान गणेश जांभुळकर यांचा भरलेला उमेदवारी अर्ज प्रतिस्पर्धी उमेदवार मयूर साखरे याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच फाडला. त्यामुळे विरोधी गटाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्याचा आरोप करत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळेतच अर्जाची पोहोचपावती दिल्याचे सांगत निवडणूक पुढे ढकलण्यास नकार दिला.

सत्तेच्या सारिपाटात हिंजवडीकरांचाही 'गुवाहाटी पॅटर्न'

राज्याच्या राजकारणात घडलेलं गुवाहाटी प्रकरण देशभर तुफान गाजलं. त्याची पुनरावृत्ती हिंजवडीच्या राजकारणात झाली. गणेश जांभुळकर सरपंच झाले. पण, त्यामागे मोठी राजकीय उलथापालथ देखील झाली.

सरपंच निवडणुकीपूर्वी सत्ताधारी सदस्य अज्ञातवासात गेले होते. त्यांनी गुवाहाटी गाठत हॉटेलमध्ये मुक्काम केला. विरोधी गटाला याची कुणकुण लागली ते ही गुवाहाटीला पोहोचले. मात्र, सत्ताधारी गट शिताफीने तिथून निसटला. निवडणुकीपूर्वी हिंजवडीत येत निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. अशा जोरदार चर्चा अन गुवाहाटी पॅटर्नचे किस्से आयटीत रंगले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

Murlidhar Mohol : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी

RRC Recruitment 2025: आनंदाची बातमी! रेल्वेमध्ये 10वी पाससाठी 3115 नवीन भरती जाहीर; सविस्तर माहिती येथे वाचा

SCROLL FOR NEXT