Indian Hindu culture Hindu New Year gudi padwa festival yatra
Indian Hindu culture Hindu New Year gudi padwa festival yatra sakal
पिंपरी-चिंचवड

वाकड : भव्य शोभा यात्रेने हिंदू नववर्षाचे स्वागत!

सकाळ वृत्तसेवा

वाकड : भारतीय हिंदू संस्कृतीप्रमाणे हिंदू नव वर्षाचे भव्य शोभा यात्रेने स्वागत करण्यात आले प्रभू श्री रामचंद्र की जय, शिवाजी महाराज की जयचा जय घोषाचा जल्लोष, पारंपरिक वाद्यांचा निनाद, फटाक्यांची आतिषबाजी, जागोजागी पुष्पवृष्टीने स्वागत अन भगवे झेंडे, भगवे फेटेधारी नागरिकांच्या गर्दीने वाकड परिसरातील वातावरण प्रसन्न आणि भगवेमय झाले होते.

पाडव्याची शनिवारी सुट्टी सायंकाळची रम्य वेळ अन दुसऱ्या दिवशी पुन्हा रविवार त्यामुळे वाकड परिसरातील आयटी अभियंत्यांनी मोठ्या संख्यने पारंपरिक वेशभूषेत या शोभा यात्रेत सहकुटुंब सहभागी झाले होते. या यात्रेत लहान मुले व महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती होती. चौका चौकात महिलांनी धरलेला फुगड्यांचा फेर टिपण्यासाठी अनेकांनी मोबाईल काढले. तर काहीजण हा क्षण आपल्या कुटुंबासह टिपण्यासाठी सेल्फी काढण्यातही व्यस्त दिसले.

आकर्षक सजावट केलेल्या भव्य रथात प्रभू श्री राम चंद्राची भव्य मूर्ती अन त्यामागे बैलगाडी, प्रभू रामचंद लक्ष्मण व सीता माई यांच्या वेशभूषेतील चिमुकले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी स्वयंसेवक तैनात होते. प्रथम सोसायटी पोलीस लाईन, येथून प्रारंभ झालेली शोभा यात्रा युरो स्कुल, पालाश सोसायटी, जानोबा चौक, दत्त मंदिर रोड, उत्कर्ष चौक, म्हातोबा चौक, छत्रपती चौक या मार्गाने अखेर कस्पटे वस्ती येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सांगता करण्यात आली. हिंदू नव वर्ष स्वागत समिती वाकड यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT