पिंपरी-चिंचवड

पिंपरी : दिव्यांग चेंबरकडून गरजूंसाठी हा नवा उपक्रम... 

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स व बडवे इंजिनिअरिंग यांच्या माध्यमातून शहरातील अनेक दिव्यांग आणि विकलांगांना रोजगार मिळत आहे. 

दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रघुनाथ येमूल व श्रीकांत बडवे यांनी दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी नुकताच हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी त्यांना पिंपरी-चिंचवड झुंज दिव्यांग संस्था तसेच, इतरही दिव्यांग संस्थांची सक्षम साथ मिळत आहे. महाराष्ट्रभर जे कोणी दिव्यांग व्यक्ती आहेत, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी लागणारी साधनसामग्री येमूल पुरवीत आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिखली येथे झालेल्या कार्यक्रमास दिव्यांग चेंबरच्या व्यवस्थापकीय संचालिका राजश्री गांगरे व त्यांचे सर्व सहकारी झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजू हिरवे, महिला अध्यक्षा निर्मला हेगडे, ओममंगल घोणे, दादासाहेब काशीद, दत्तात्रेय काळे संस्थेचे सर्व उपस्थित होते. या वेळी हेगडे यांच्याकडून एक हजार मास्क चेंबरने विकत घेतले. चेंबरने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिव्यांग लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी असे सेंटर सुरू केले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यासंदर्भात राजश्री गांगरे यांनी सांगितले, "आमच्या चेंबरच्या वतीने 'ना नफा-ना तोटा' या तत्त्वावर दिव्यांगांना चार पैसे मिळावेत, यासाठी हा उपक्रम राबविला जातो. गेल्या सात-आठ महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे. अनेकदा या दिव्यांगांनी तयार केलेली उत्पादने दर्जेदार असतात. मात्र, त्याला बाजारपेठ उपलब्ध नसते. या निमित्ताने त्यांनी बनविलेली उत्पादने विकत घेऊन त्याच्या योग्य ग्राहकांपर्यंत 'ना नफा-ना तोटा' तत्त्वावर दिली जातात.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT