Self Help Group
Self Help Group Esakal
पिंपरी-चिंचवड

Motivation News : अपंगत्वावर मात करून व्यवसायाशी ‘मैत्री’; कापडी पिशव्या शिवून बनल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम

सकाळ वृत्तसेवा

- अश्‍विनी पवार

पिंपरी - दिव्यांगांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी केवळ एका संधीची गरज असते. ती संधी जर त्यांना योग्य वेळेत मिळाली, तर त्यांच्यातील कलेला व कौशल्याला वाव मिळून त्यांना हरवलेला आत्मविश्वास परत मिळू शकतो. आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन तेही सामान्य नागरिकांप्रमाणे आयुष्य जगू शकतात.

हीच किमया साधली आहे चिखलीतील घरकुल वसाहतीतील मैत्री अपंग महिला बचत गटातील महिला सदस्यांनी. अपंगत्वावर मात करून त्यांनी कापडी पिशव्या शिवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. आपणही इतरांप्रमाणे कमवू शकतो, संसाराला हातभार लावू शकतो, याचे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसते.

चिखलीतील घरकुल येथे राहणाऱ्या दिव्यांग महिलांनी मिळून पाच वर्षांपूर्वी मैत्री अपंग महिला बचत गटाची स्थापना केली. त्यातून प्रत्येकीलाच काही ना काही व्यंग असल्याने जनमानसात मिसळण्याचा आत्मविश्वास नव्हता. या महिलांनी घराबाहेर पडावे, त्यांना अपंगांच्या हक्कांबदल व शासनाच्या उपक्रमांबद्दल माहिती मिळावी, यासाठी घरकुल अपंग साहाय्य संस्थेने हा बचत गट स्थापन करण्यात पुढाकार घेतला.

कधीही घराबाहेर न पडलेल्या, दैनंदिनी व्यवहार माहिती नसलेल्या या महिलांच्या मनातून न्यूनगंड जावा, त्यांनी नवी उभारी घ्यावी व त्यांचे अर्थार्जन व्हावे यासाठी या बचत गटाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले व यात या महिला यशस्वीही देखील झाल्या.

२०१७ मध्ये या बचतगटाची स्थापना झाली. त्यातील काही महिलांना शिवणकाम येत होते. काहींना अपंगत्वामध्ये कधीच काही करण्याची संधी मिळाली नव्हती. अशा महिलांनी अपंग साह्य संस्थेच्या माध्यमातून कापडी पिशव्या शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. जुन्या साड्या व शिवणकामातून उरलेल्या कापडापासून मॅट बनविण्याचेही काम या महिलांनी सुरू केले.

काही ऑडर्स पिंपरी-चिंचवड महापालिकेने या महिलांना दिल्या तर काही पिशव्या महापालिकेने विकत घेतल्या. या गटाकडून निरनिराळ्या प्रदर्शनांमध्ये स्टॉल लावून पिशव्यांची विक्री केली जाते. यातून महिलांचा काम करण्याचा आत्मविश्वास वाढला. सध्या या महिला वैयक्तिक पातळीवर देखील काम घेत आहेत. यामधून पैशात मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा आपणही आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतो, हे समाधान त्यांच्यासाठी मोठे आहे.

या आधी मी घराच्या बाहेर कधीच पडले नव्हते. अपंग साहाय्य संस्थेने आमचा बचत गट स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याच्या कामानिमित्त मी पहिल्यांदा पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेले. सर्व महिलांचे प्रश्न सारखेच असल्याने एकमेकींना आधार देत आम्ही कामाला सुरुवात केली. त्यातून किती मोबदला मिळतो, यापेक्षा आम्ही काहीतरी करू शकतो, याचा आनंद जास्त आहे.

- रेखा पाडोळे, सदस्या, मैत्री अपंग महिला बचत गट

पिंपरी-चिंचवडमधील अपंग नागरिकांना मदत करण्याचे काम आमची संस्था करते. अपंग व्यक्तींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्यात ती महिला असेल तर तिच्यामध्ये न्यूनगंड असतो. अशा महिलांनी एकत्र यावे व आपण काहीतरी करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण व्हावा, यासाठी आम्ही या महिलांचे बचतगट स्थापन करण्यास पुढाकार घेतला. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ यशस्वीरीत्या हे बचतगट कार्यरत आहेत.

- विद्या तांदळे, खजिनदार, घरकुल अपंग साहाय्य संस्था

बचत गटातील सर्व महिला एकत्रितरीत्या कापडी पिशव्या व पायपुसण्या शिवण्याचा व्यवसाय करतात. मात्र, ज्यांना वैयक्तिक पातळीवर काहीतरी करायचे आहे, त्यांनाही बचत गटाकडून प्रोत्साहन दिले जाते. बचतगटातून आपल्या व्यवसायासाठी अर्थसाहाय्यही मिळत असल्याने आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे.

- संगीता पटेल, सदस्या, मैत्री महिला बचत गट

चिखली - मैत्री महिला बचत गटातील दिव्यांग महिला कापडी पिशव्या, पायपुसणे यांसारखी उत्पादने तयार करून सक्षम झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT