पिंपरी-चिंचवड

पवन मावळातील परंदवडीत कोरोनाबाधित सापडल्याने गाव सील!

सकाळ वृत्तसेवा

बेबडओहोळ : चांदखेड पाठोपाठ परंदवडी गावात ४२ वर्षीय महिला शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने परंदवडी गाव सील करण्यात आले. नऊ दिवसांत सहा कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या.

मावळ तालुक्यातील चांदखेडमध्ये गुरुवारी (ता. २१) एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्याच रुग्णाच्या कुटुंबातील आणखी चौघांना कोरोनाची लागण झाल्याने चांदखेड व परीसरातील नागरिकांची आणखी चिंता वाढली. यानंतर नऊ दिवसांनी शुक्रवारी (ता. २९) परंदवडीत एक महिला शिक्षक कोरोनाबाधीत सापडली. यामुळे आता परीसरातील आठ गावांतील ग्रामस्थांनी चांगलाच धसका घेतला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत आढले प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. दिलीप सुर्यवंशी यांना सांगितले, की सदर महिला तळेगाव या ठिकाणी भाजीपाला व काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. यानंतर त्रास होऊ लागल्याने महिलेची बहिण पुणे येथे डॉक्टर असल्याने तपासणी केली. त्यात महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने घरातील दोन मुले, आई-वडील व संपर्कातील ड्रायव्हर या चार जणांना तपासणीसाठी तळेगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे पाठवण्यात येणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बाधीत रुग्णाच्या बिल्डिंगमध्ये सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करण्यात आली असून, परंदवडी सील करण्यात आले. चांदखेड पाठोपाठ परंदवडीत आता कोरोनाचा शिरकाव झाल्याने या गावाजवळील धामणे, सोमाटणे, ऊर्से, आढे, ओझर्डे, सडवली, बऊर व बेबडओहोळ गावातील ग्रामस्थांनी आता चांगलाच धसका घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT