pimpri chichwad
pimpri chichwad  sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad : स्टॉलधारकांना व्यवसाय परवाना बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

Pimpri-Chinchwad - १२ दिवसांवर आला आहे. लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी लगबग सुरू आहे. मंडप, सजावट, आरास, मूर्ती, नैवेद्यासाठीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. याबाबतचा आढावा घेणारी वृत्तमालिका आजपासून...

पिंपरी, ता. ६ : अवघ्या बारा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशमूर्तीच्या विक्रीसाठी विक्रेत्यांची स्टॉल उभारण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र, विक्रीसाठी महापालिकेचा व्यवसाय परवाना घेणे सक्तीचा आहे. त्यामुळे व्यवसाय परवाना घेण्यासाठी १९४ जणांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे अर्ज केला आहे.

येत्या १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे. त्यासाठी शहरातील असंख्य मूर्तिकारांनी सुबक गणेश मूर्ती बनविल्या आहेत. पिंपरी महापालिकेच्या हद्दीत साधारणतः दीड हजार छोटी-मोठी सार्वजनिक गणेश मंडळे आहेत.

सेच सोसायट्या, कॉलनी, वसाहत तसेच, घरोघरी गणेशमूर्ती बसविली जाते. त्यासाठी दरवर्षी पिंपरीगाव, चिंचवडगाव, संत तुकारामनगर, एम्पायर इस्टेट चिंचवड स्टेशन, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, काळेवाडी, थेरगाव, निगडी, रुपीनगर, भोसरी गावठाण, दिघी, सांगवी आदी परिसरात शेकडो स्टॉल उभारून मूर्तीची विक्री केली जाते. मूर्ती विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होते. शहरातील काही कारखान्यांत मूर्ती तयार करून त्याची विक्री केली जाते.

परवानासाठी ४९९ रुपये शुल्क

मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यासाठी महापालिकेचा व्यवसाय परवाना असणे बंधनकारक

आहे. त्यासाठी ४९९ रुपये शुल्क भरावे लागते. अर्जासोबत जागेचा नकाशा, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड व पॅनकार्डची झेरॉक्स प्रत जोडावी लागते. १२ सप्टेंबरपर्यंत व्यवसाय परवान्यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. परवाना मिळाल्यानंतर १९ सप्टेंबरपर्यंत मूर्तीची विक्री करता येणार आहे.

व्यवसाय परवाना असल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून स्टॉलसाठी मंडप टाकण्यास परवानगी दिली जाते. त्यासाठी वाहतूक पोलिसांचाही ना हरकत दाखला

आवश्यक असतो.

प्रथमच आकाशचिन्ह विभाग देणार परवाना

दरवर्षी महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाकडून स्टॉलसाठीचे भुईभाडे द्यावे लागत होते. या वर्षापासून महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे स्टॉलधारकांनी व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे स्टॉलधारकांनी भूमी व जिंदगी विभागाकडे अर्ज करू नयेत.

त्यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज करणे आवश्‍यक आहे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

शहरात गणेशमूर्ती विक्री करण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे अर्ज येत आहेत. त्यावर तत्काळ कार्यवाही करून परवाना दिला जात आहे. व्यवसाय परवाना असल्याशिवाय मूर्ती विक्री केल्यास कारवाई केली जाणार आहे.

सुभाष इंगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

SCROLL FOR NEXT