Flat sakal
पिंपरी-चिंचवड

Sakal Vastu Expo 2023 : चिखली-मोशीत मिळतंय मनपसंत घर; बजेटमधील घरांमुळे वाढली मागणी

चिखली-मोशी परिसरात घरांना मोठी मागणी आहे. रेडिरेकनरचे दर राज्य सरकारने या वर्षी वाढविले नाहीत. त्यामुळे घरांच्या किमती वाढलेल्या नाहीत. ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

चिखली-मोशी परिसरात घरांना मोठी मागणी आहे. रेडिरेकनरचे दर राज्य सरकारने या वर्षी वाढविले नाहीत. त्यामुळे घरांच्या किमती वाढलेल्या नाहीत. ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

पिंपरी - ‘मी आधी मुंबईत होतो. गेल्या वर्षी कंपनीने पुण्यात बदली केली. बाणेरमध्ये ऑफिस आहे. आठवड्यातील तीन दिवस वर्क फ्रॉम होम आहे. केवळ गुरुवार, शुक्रवारी ऑफिसला जावे लागते. शनिवार, रविवारी विकेंड असतो. आई-वडील व पत्नी असे चार जणांचे कुटुंब आहे. सध्या भाडेतत्वावर वन बीएचके घेतला आहे. महिन्याला नऊ हजार रुपये भाडे आहे. स्वतःच घर घ्यावे म्हणून अनेक भागात फ्लॅट बघितला. पण, कामाचे ठिकाण व येण्या-जाण्याच्या सुविधा पाहता पसंत पडले नाही. नातेवाइकांच्या सांगण्यानुसार वडिलांसोबत मोशीत आलो. पाहताक्षणी फ्लॅट पसंत पडला आणि पन्नास हजार रुपये देऊन बुक केला. दिवाळीपर्यंत ताबा मिळणार आहे. मनासारखं घर मिळालंय,’ हे शब्द आहेत आयटी अभियंता पुरुषोत्तमचे.

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडच्या उत्तरेकडील उपनगर चिखली आणि त्याशेजारचं, पण पुणे-नाशिक महामार्गावरचं मोशी. पूर्वी चिखली म्हटलं की भंगाराची दुकाने आणि मोशी म्हटलं तर चाळी, शेतामधली कौलारू घरं, असं चित्र डोळ्यांसमोर उभे राहायचे. पण, गेल्या काही वर्षात दोन्ही उपनगरांनी कात टाकली आहे. गगनचुंबी इमारती असलेले व पाचशेपेक्षाही अधिक सदनिका असलेले मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. या भागाचा कायापालट झाला आहे.

चिखलीपासून मोशीपर्यंत देहू-आळंदी रस्त्यालगत नवे मार्केट उभे राहिले आहे. जीवनावश्यक किराणा मालाच्या दुकानांसह फर्निचर मॉल्स जागोजागी आहेत. इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल उपकरणांची दुकाने आहेत. सराफ, कापड, सौंदर्य प्रसाधने, होम डेकोरेटर, इंटेरियर डिझाईन, वाहनांचे सुटे भाग मिळणारी दुकाने आहेत. दरवाजे, खिडक्या, ग्रील्स, पडदे असे सर्व प्रकारचे साहित्य या भागात मिळते. अनेक नामांकित शैक्षणिक संकुले उभी राहिली आहेत. हॉटेल्स व उपहारगृहे आहेत. शिवाय, वन बीएचकेपासून फोर बीएचके पर्यंतचे मनासारखे प्रत्येकाच्या बजेटमधली घरे इथे उपलब्ध आहेत.

चिखली-मोशी परिसरात घरांना मोठी मागणी आहे. रेडिरेकनरचे दर राज्य सरकारने या वर्षी वाढविले नाहीत. त्यामुळे घरांच्या किमती वाढलेल्या नाहीत. ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. रेडिरेकनरचे दर वाढले असते तर नवीन प्रकल्पातील घरांच्या किमती वाढल्या असत्या. मात्र, पुढच्या वर्षी रेडिरेकनर दर वाढल्यास जमिनीच्या किमती वाढतील. पर्यायाने नवीन गृहप्रकल्पांतील घरांच्या किमतीही वाढतील.

- नरेंद्र अगरवाल, संचालक, ऐश्वर्यम् ग्रुप

पिंपळे सौदागर, रावेतप्रमाणे चिखली-मोशी भाग विकसित होत आहे. त्या भागाप्रमाणेच इथेही महापालिकेकडून सुविधा मिळत आहेत. येथील काही भाग नवनगर विकास प्राधिकरणाचाही आहे. त्यामुळे तेथील दर वेगळे आहेत. पण, रेडिरेकनरचे दर न वाढल्यामुळे चिखली-मोशी भागात घर घेणे परवडत आहे. एका घरामागे नागरिकांचे एक ते दीड लाख रुपये वाचून फायदा होत आहे. त्यामुळे घरांचे बुकिंग वाढले आहे.

- संतोष बारणे, संचालक, सिल्व्हर ग्रुप

स्थानाचे महत्त्व

  • देहू-आळंदी रस्ता, पुणे-नाशिक महामार्ग प्रशस्त आहे

  • एका बाजूला इंद्रायणी नदी असून निसर्गसौंदर्य आहे

  • नदी व देहू-आळंदी रस्त्याच्या मध्ये समांतर रस्ता

  • भविष्यातील पाण्यासाठी चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प

  • चिखली आणि चऱ्होलीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

  • कृषी उत्पन्न उपबाजार व स्थानिक मंडईमुळे ताजा भाजीपाला

  • मोशीतील नागेश्वर व चिखलीतील टाळ मंदिरामुळे धार्मिक महत्त्व

प्रस्तावित प्रकल्प

  • आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र

  • छत्रपती संभाजी महाराज स्मारक

  • पीसीओई अर्थात पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय

  • सत्र न्यायालय संकुल आणि न्यायाधीश निवासस्थाने

  • महापालिका अग्निशामक केंद्र

  • पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण सहा पदरीकरण

  • हिंजवडी- नाशिक फाटा- भोसरी-चाकण मेट्रो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT