Tata Motors with Girish Bapat
Tata Motors with Girish Bapat sakal
पिंपरी-चिंचवड

MP Girish Bapat Passes Away: टाटा कंपनीचे ऋण फेडण्याचे काम बापट यांनी केले

सकाळ वृत्तसेवा

दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी टाटा मोटर्स कंपनीत कामगार म्हणून काम केले. त्यांच्या राजकीय उभारणीत टाटा मोटर्स परिवाराचे मोठे सहकार्य होते.

पिंपरी - दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी टाटा मोटर्स कंपनीत कामगार म्हणून काम केले. त्यांच्या राजकीय उभारणीत टाटा मोटर्स परिवाराचे मोठे सहकार्य होते. ही भावना त्यांनीही अनेकवेळा बोलून दाखविली. परंतु, राज्याचे परिवहन मंत्री झाल्यानंतर २००० साली जागतिक मंदि असताना बापट यांनी तातडीने एसटी महामंडळासाठी टाटा मोटर्सकडून एक हजार बसेसची खरेदि करण्याचा निर्णय घेतला. ज्या कंपनीच्या जीवावर आपण मोठे झालो. त्या कंपनीचे ऋण फेडण्याचे काम त्यांनी त्यावेळी केले.

ही भावना टाटा मोटर्सच्या कामगारांमध्ये त्यावेळी निर्माण झाली होती. कंपनीला मोठी ऑर्डर (काम) मिळाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यामुळेचटाटा मोटर्स एम्प्लॉईज युनीयनच्यावतीने तत्कालीन पदाधिकारी शिवाजी शेडगे, सुजीत पाटील, एकनाथ पवार यांनी त्यांचा मोठा सत्कार चिंचवड येथे केला होता. बापट यांचे निधन झाल्यानंतर टाटा मोटर्सच्या विद्यमान व निवृत्त कामगारांमध्ये या आठवणी जाग्या झाल्या.

बापट यांनी टाटा मोटर्स (त्यावेळची टेल्को) कंपनीत १९७३ मध्ये स्टोअर्स विभागात काम करण्यास सुरुवात केली. १९८३ मध्ये नगरसेवक झाल्यावर व नंतर आमदार झाल्यावरही निवृत्तीपर्यंत कंपनी त्यांना पगार देत होती. एकप्रकारे ते ऑन ड्युटी समाजसेवा करत होते. टाटा मोटर्समुळे मला राजकारणात काम करण्याची संधी मिळाली, असे ते आर्वजुन सांगायचे. त्यामुळेच त्यांनी आमदार, मंत्री झाले तरी टाटा मोटर्स परिवाराचा स्नेह कायम ठेवला. टाटा मोटर्स परिवाराची नाळ तुटू दिली नाही.

आमदार, मंत्री झाले तरी गिरीश बापट टाटा मोटर्स कामगार व मित्र परिवाराबरोबर ‘गेट टुगेदर’ करायचे. त्यांच्या करीअरची सुरुवात टाटामधून झाल्यामुळे शेवटपर्यंत टाटा परिवराच्या संपर्कात होते. ते कायम कंपनीत येत असत. कामगारांचे शासन दरबारी असणारे प्रश्‍न सोडविण्यासाठी ते कायम मदत करत.

- नामदेव ढाके, माजी पदाधिकारी, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनीयन.

गिरीश बापट यांचे टाटा मोटर्सच्या कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. कामगार वेतन कराराच्यावेळी वाटाघाटी करताना युनीयनला ते कायम मार्गदर्शन करायचे. त्यांनी कधीही पक्षीय भेदाभेद केला नाही. त्यांना कंपनीकडून मिळणारे वेतन ते स्वत:साठी न वापरता समाजोपयोजी कामासाठी वापरत असत.

- सुजीत पाटील, माजी अध्यक्ष, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनीयन.

टाटा मोटर्स युनीयनमध्ये सर्वपक्षीय लोक होते. परंतु, गिरीश बापट यांनी कधीही युनीयनच्या राजकारणात ढवळाढवळ केली नाही. ज्या-ज्या वेळी त्यांना कोणी कामगार नेत्यांनी मदत मागितली तर; त्यांनी ती तत्परतेने केली. टाटा मोटर्स कामगारांमधून पहिले आमदार, मंत्री, खासदार होण्याचा मान त्यांना मिळाला.

- एकनाथ पवार, माजी अध्यक्ष, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनीयन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एकाला अटक, ३ दिवसांची पोलीस कोठडी!

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत सापडले आणखी दोन मृतदेह! 14 वरून आकडा पोहचला 16 वर...काही जण अडकल्याची भिती

Accident News: हैदराबादला जाणाऱ्या बसला आग लागल्याने सहा जणांचा मृत्यू, बस जळून खाक

Share Market Today: शेअर बाजाराच्या रिकव्हरीत कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

दिल्लीच्या विजयामुळे बदललं CSK, RCB अन् SRHचं नशीब! कोणाला झाला फायदा अन् कोणाचं नुकसान? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT