पिंपरी : मुलांच्या सुरक्षेसाठी शाळांकडून तयारी
पिंपरी : मुलांच्या सुरक्षेसाठी शाळांकडून तयारी sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : मुलांच्या सुरक्षेसाठी शाळांकडून तयारी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या दीड वर्षांपासून शाळेला असलेले टाळे आता निघत आहे. या निर्णयामुळे शहरातील ६७१ शाळा सुरू होण्याच्या तयारीत आहेत. अनेक शाळांनी शिक्षकांची बैठक घेउन नियोजनदेखील केले आहे. परिणामी ८० हजार मुलांची ऑनलाइन वर्गातून सुटका होणार असून, मुलांना वर्गात बसून शिकता येणार आहे. शाळा सुरू करायचा निर्णय योग्यच असल्याची सहमती पालकांनी दर्शविली आहे.

शहरात महापालिका आणि खासगी अशा सर्व व्यवस्थापनाच्या आठवी ते बारावीच्या एकूण ६७१ शाळा आहेत. दरम्यान, तिसऱ्या लाटेची शक्यता असताना शाळा सुरू करण्याचे मोठे आव्हान शाळा पेलत आहेत. कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान शैक्षणिक क्षेत्राचे झाले आहे. या काळात शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन वर्गाचा पर्याय निवडण्यात आला. मात्र, परिसरातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती, स्मार्ट मोबाईल फोनचा अभाव, नेटवर्क अशा अनेक अडचणींमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. यासाठी काही शिक्षक वस्त्यांमध्ये आठवड्यातून एकदा जाऊन वर्ग घेत होते, पण त्यालाही मर्यादा होत्याच. पण आता कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. रुग्णांच्या संख्येतही घट होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्‍वभूमीवर ठाकरे सरकारने चार ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

त्यानुसार आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने शिक्षण विभागास दिले आहेत. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेने शाळा सुरू करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्यावर व्यवस्थापनाने भर दिला आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे, शाळा सॅनिटाइज करणे, शाळेत आरोग्य कक्ष तयार ठेवणे अशी तयारी विविध शाळा करू लागल्या आहेत.

सरकारने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय एकदम योग्य असून, या मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे शाळा व पालकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. खबरदारी घेण्यासाठी ज्या गोष्टींची गरज लागणार आहे. त्या शाळेने सीएसआर फंडातून उभाराव्यात. ज्यामुळे पालकांवर आर्थिक ताण पडणार नाही, सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांचा खूप फायदा आहे. त्यांना ऑनलाइन शिक्षण घेत असताना येणाऱ्या मोबाईल लॅपटॉप इंटरनेट व शांततापूर्ण वातावरण या गोष्टीच्या उणिवा जाणवत होत्या. ज्यामुळे गरिबांच्या मुलांची शैक्षणिक प्रगती ऑनलाइन शिक्षणामुळे खुंटली होती.

- रहीम एम. सय्यद, अध्यक्ष पालक संघ

शाळा सुरू करण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे. शिक्षकांच्या बैठकीत नियोजन केलेले आहे. चाचणी परीक्षा झाल्यावर पालकांची बैठकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार तिन्ही वर्ग सुरू होतील.

- अशोक जाधव, कार्याध्यक्ष, पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ

मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करायला मंजुरी दिली आहे, योग्य निर्णय घेतला आहे. शाळा बंद असल्यामुळे मुलांमध्ये घरात बसून चिडचिडेपणा बघायला मिळत आहे. ऑनलाइन शाळेत शिकवतात. पहिली ते आठवी एक ते दोन तासच शिकवतात, ते विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. कधी कधी मोबाईलचा नेटवर्क समस्या असतात. शाळा सुरू करायचा निर्णय योग्यच आहे, पण शारीरिक अंतराचे पालन करून शाळा सुरू कराव्यात.

- चंद्रशेखर कणसे, पालक नेहरूनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT