पिंपरी-चिंचवड

औंध-रावेत मार्गावरील सब-वेचा मार्ग मोकळा 

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : औंध-रावेत बीआरटीएस मार्गावर कावेरीनगर येथे भुयारी मार्ग (सब-वे) उभारण्यात आला आहे. मात्र, त्यावरून महापारेषणाच्या उच्चदाब वाहिन्या गेलेल्या असल्याने त्यांची उंची वाढविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापारेषणने 32 लाख 60 हजार 354 रुपये शुल्क महापालिकेकडे मागितले होते. हा निधी उपलब्ध होत नसल्याने गेल्या वर्षापासून काम रखडले होते. त्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, 32 लाख 60 हजार 354 रुपये महापारेषणला दिले जाणार आहेत. 

पुण्यासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर औंध-रावेत बीआरटी मार्गामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळरू महामार्गाला जोडले गेले आहे. शिवाय जुना पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग आणि आयटी पार्क हिंजवडीला जाणेही सोयीचे झाले आहे. त्यामुळे या मार्गाने वाहनांची वर्दळ वाढली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बीआरटी मार्गाच्या रुंदीकरणामुळे लगतच्या नागरिकांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. त्यामुळे मार्गावर डांगे चौक, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी चौक, सांगवी फाटा आदी ठिकाणी उड्डाणपूल उभारले आहेत. अनेक ठिकाणी भुयारी मार्ग उभारले आहेत. काही ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यातीलच एक भुयारी मार्ग म्हणजे कावेरीनगर येथील सब-वे होय. त्याचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे. त्यावरील उच्चदाब वाहिन्या स्थलांतरीत करणे किंवा त्यांची उंची वाढविणे आवश्‍यक होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

औंध-रावेत बीआरटी मार्गावर काळेवाडी फाटा ते डांगे चौकदरम्यान कावेरीनगर येथे सब-वे उभारण्यात आला आहे. त्यावरून 132 केव्हीच्या वीज वाहिन्या गेल्या आहेत. सब-वे मुळे रस्ता व वाहिन्यांतील अंतर कमी झाले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी वीजवाहिन्यांच्या खांबांची (टॉवर) उंची वाढविणे आवश्‍यक आहे. त्यानुसार महापारेषण कंपनीने सर्वे करून वीज वाहिन्यांची व खांबांची उंची वाढविण्याचा खर्च अर्थात शुल्क भरण्याची सूचना महापालिकेला केली आहे. त्यानुसार 32 लाख 60 हजार 354 रुपये महापारेषण कंपनीला दिले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT