पिंपरी-चिंचवड

बाळासाहेब नेवाळे यांचे जिल्हा बॅंक संचालकपद कायम

CD

कामशेत, ता. १३ : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे संघाच्या तीन बैठकांना गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत त्यांचे संचालकपद रद्द करण्यात आले होते. या विरोधात बाळासाहेब नेवाळे यांनी अपील केले दिले होते. त्याचा निकाल नेवाळे यांच्या बाजूने लागला असून, या निकालानुसार त्यांचे संचालकपद कायम ठेवण्यात आले आहे.
नेवाळे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या बैठकांना हजर राहिले नसल्याचा ठपका ठेवून संचालकपद रद्द केले होते. दूध संघाच्या सलग तीन वेळा झालेल्या बैठकांना नेवाळे न गेल्याने संघातील उपविधीमधील पोटकलम क्र. १४.२० तरतुदीनुसार रद्द झाल्याबाबत विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) पुणे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्याखालील नियम १९६२ मधील नियम ५८ अन्वये आदेशाने नेवाळे यांचे संचालकपद रद्द संपुष्टात आल्याचे घोषित केले होते. यावर नेवाळे यांनी सहनिबंधक सहकारी (दुग्ध) महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील दाखल केले. वादी व प्रतिवादी यांच्या वकिलांचे लेखी म्हणणे व तोंडी युक्तिवाद ऐकल्यानंतर सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) महाराष्ट्र राज्य मुंबई बी. एल. जाधव यांनी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) पुणे यांचा २२.१०.२०२१ चा आदेश रद्द करत बाळासाहेब नेवाळे यांचा पुनर्रिक्षण अर्ज मंजूर केल्याने नेवाळे यांचे संचालकपद कायम राहिले आहे.
नेवाळे यांचे संचालकपद रद्द करताना नैसर्गिक न्याय तत्त्वाचा वापर करण्यात आलेला नाही. नेवाळे यांच्यावर दाखल गुन्ह्यांमध्ये त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. यामुळे ते सलग तीन बैठकींना गैरहजर राहिले. मात्र, तिसरी सभा होण्याच्या अगोदर त्यांनी दूध संघाला पत्र पाठविले होते व ते पत्र तिसऱ्या सभेच्या एक दिवस अगोदर प्राप्त झालेले असताना देखील तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यासर्व बाबींचा विचार करून हा आदेश देण्यात आला आहे, असा आदेश जाधव यांनी दिल्याने नेवाळे यांचे संचालकपद कायम राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT