पिंपरी-चिंचवड

कवितेची केली ‘पूजा’ अन् नशिबाने दिली सजा!

CD

आपण नवकवी आहोत, याचा राहुलला मोठा अभिमान होता. सहज बोलता बोलता ‘ट’ला ‘ट’ जोडून तो दुसऱ्यांना कविता ऐकवून, त्यांना घाम फोडायचा. राहुलला बघताच मित्रमंडळींचा घोळका पांगायचा. ‘उद्या भेटू’ असे म्हणून ते एकमेकांचा निरोप घ्यायचे. तरीही राहुल हार मानायचा नाही. समोरच्याला पकडून ताजी कविता ऐकवायचाच. त्यांच्याकडून दाद मिळाली नाही तर हा स्वत:च ‘वाऽऽ वाऽ’ करून टाळ्या वाजवायचा. त्यातच त्याने स्वतःच्या खर्चाने कवितासंग्रह छापला. मात्र, तो कोणी विकत घेत नसल्याने त्याचे गठ्ठे तसेच पडून होते. त्यामुळे घरच्यांची बोलणीही त्याला खावी लागायची. मात्र, या कवितांच्या जोरावर माझे लग्न ठरेल, असा त्याला विश्वास होता. त्यातूनच दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याचा नाद त्याला लागला. त्यातही कौतुक करण्यातही त्याची गाडी सुसाट सुटायची. यात जर एखादी तरुणी असेल तर त्याचा उत्साह धबधब्यासारखा वाहायचा. मग थोडी ओळख वाढल्यानंतर तो कवितासंग्रह तिला सप्रेम भेट द्यायचा. तिचा व्हॉटसअॅप नंबर मागायचा. पण मुली नंबर द्यायला काय तयार नसत, हा भाग वेगळा. कोरोनाच्या काळात लग्न झालं तर कमी खर्चात होईल, याचा अंदाज आल्याने यंदा लग्न करायचंच, असा ठाम निर्धार त्याने केला होता. यासाठी परत त्याने कवितासंग्रहाची नवीन आवृत्ती छापली.
बरेच दिवस झाले तरी त्याला मनोज भेटला नाही. त्यामुळे तो कवितासंग्रहाच्या काही प्रती घेऊन त्याला भेटायला चालला होता. वर जाण्यासाठी तो लिफ्टमध्ये शिरला. तेवढ्यात एक तरुणी पाच-सहा वर्षांच्या मुलाला घेऊन लिफ्टमध्ये आली. तिच्याकडे पाहून राहुलने स्मित केले व म्हणाला, ‘‘दुसरा की तिसरा?’’ त्याचं हे बोलणं ऐकून तरुणी एकदम भडकली. ‘‘वाट्टेल ते काय बोलता? मी त्याची आत्या आहे. माझं अजून लग्न व्हायचंय.’’ तिचं हे बोलणं ऐकताच राहुलचा चेहरा उजळला.
‘‘अहो, मी लिफ्टविषयी बोलतोय. दुसरा की तिसरा मजला असं मला म्हणायचंय. मला तर वाटलं तुम्ही या मुलाच्या मोठी बहिण आहात. बारावीला वगैरे असाल, असा माझा अंदाज होता.’’ राहुलचं बोलणं ऐकून ती तरुणी सुखावली. मग राहुलने सही करून कवितासंग्रह तिच्या हातात दिला. ‘कविता वाचून प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमचं नाव काय?’ राहुलच्या या प्रश्नावर ती तुटकपणे ‘पूजा’ म्हणाली. मग त्याने व्हॉट्सॲप नंबर मागितला. नाइलाजाने तिने व्हिजिटिंग कार्ड त्याच्या हातात दिले. ते पाहताच राहुल हुरळून गेला. त्या व्हिजिटिंग कार्डकडे तो बघतच बसला. आपलं लग्न ठरलंय, अशी दिवास्वप्न तो पाहू लागला. अक्षरशः हवेत तरंगतच तो घरी आला. मात्र, दोन-तीन दिवसांनंतरही तरुणीचा फोन न आल्याने तो कासावीस झाला. कविता कशा वाटल्या, हे विचारण्यासाठी मग त्यानेच फोन केला. पलीकडून ‘पूजा रद्दी केंद्र’ असा आवाज आल्याने राहुलला धक्का बसला. ‘पेपरची रद्दी : १२ रुपये किलो व पुस्तकांची रद्दी सात रुपये किलो आहे. आम्ही होम सर्विसही देतो.’’ हे ऐकताच त्याने फोन बंद केला. सध्या राहुलला पूजा रद्दी केंद्रातून रद्दी आणून देण्यासाठी रोज चार-पाच वेळा फोन येतो. हे ऐकताच राहुलचा चेहरा साफ पडतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT