उर्से, ता. ३ : येथे कृषी दिनानिमित्त भात, सोयाबीन बीजप्रक्रिया व कृषी उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कृषी विभाग व डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आकुर्डी च्या वतीने रावी कार्यक्रमाच्या कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत हे आयोजन केले होते. यावेळी प्राचार्य एन. एन. पाटील, कृषिकन्या अमृता चांडोले, एकता ढवळे, श्रुती कोपनर, जान्हवी कुपेकर, अनोघा मेश्राम, असदा मुल्ला, उपकृषी अधिकारी, वडगाव नवीनचंद्र बोराडे, उपकृषी अधिकारी, काळे कॉलनी विकास गोसावी, सहाय्यक कृषी अधिकारी प्रमिला भोसले व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन बोराडे यांनी शेतकऱ्यांना रासायनिक व सेंद्रिय बीजप्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगितले. थायरम, ट्रायकोडर्मा, गोमूत्र तसेच चारसूत्री, एस.आर.टी., अभिनव पद्धत लागवड याबाबत मार्गदर्शन केले. प्रमिला भोसले यांनी कृषी विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य व समन्वयक डॉ. एस. एन. पाटील, मार्गदर्शक घोलप तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, सरपंच, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. हा उपक्रम कृषी दिनानिमित्त राबवण्यात आला असून, यामधून शेतकऱ्यांमध्ये सुधारित शेती पद्धतीतून जनजागृती करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.