पिंपरी-चिंचवड

‘अवैध दारू विक्री करणाऱ्यांना आळा घाला’

CD

चिखली, ता. २५ : मोरे वस्ती येथील अंगणवाडी रस्त्यावर पोलिस व महापालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने अवैध रीतीने हातभट्टीतील दारू विक्री सुरू आहे. दारू पिऊन रस्त्यावर उच्छाद मांडणाऱ्या तळीरामामुळे या भागातील महिला ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अंगणवाडी रस्त्यावर अवैध रीतीने सुरू असलेली दारू विक्री बंद करावी, अशी मागणी स्वराज पक्षाचे शहर निमंत्रक विजय जरे यांनी चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्याकडे केली आहे.
मोरे वस्तीमध्ये ये-जा करण्यासाठी अंगणवाडीच्या बाजूचा मुख्य रस्ता आहे. सायंकाळी भाजी खरेदी करण्यासाठी महिला तसेच, ज्येष्ठ नागरिकांना याच रस्त्याने ये-जा करावी लागते. याच रस्त्याच्या समोर हातभट्टी असून त्या ठिकाणी दारूची विक्री केली जाते. मद्यपी येथून ये-जा करणाऱ्या महिलांकडे पाहून विचित्र हाव भाव-करतात. त्यांना जाब विचारल्यास शिवीगाळ देखील करतात. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. शाळेतील मुलांनाही या तळीरामांचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत साने चौक पोलिस चौकीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी विनंती अर्ज करूनही या प्रकाराला आळा घालण्यात आलेला नाही. तरी, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अवैद्य दारू विक्री बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत ज्ञानेश्वर काटकर म्हणाले, ‘‘अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यात आली होती, तरीही पोलिसांची नजर चुकून हा प्रकार पुन्हा सुरू असल्यास नागरिकांनी माहिती द्यावी त्यावर कारवाई करण्यात येईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT