चिंचवड, ता.१४ ः केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन या मुख्य रस्त्यावर दुभाजकाजवळ साधारण पाचशे मीटरपर्यंत परिसरात मोठ्या प्रमाणावर मातीचे ढीग गोळा करून ठेवलेले आहेत. दुचाकी चालकांना ते सहज न दिसल्याने त्यावरून वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. रस्ता पूर्णपणे ओबडधोबड अवस्थेत झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या परिसरात आयटी कंपनीचे बांधकाम आणि रस्त्यावरील खोदकामाने तेथील माती व ढिगारा रस्त्यावर जमा झाला आहे. त्यामुळे, वाहनांच्या चाकाखाली सतत धुरळा उडतो आहे. त्याचा दुचाकी चालकांना मोठा त्रास होत असून वाहन चालवताना पुढील वाहनांनी उडवलेल्या धुराळ्यामुळे पुढील काही दिसत नाही. परिणामी, कधीही गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्याच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणात मातीचे ढीग टाकलेले असून पादचारी व छोट्या वाहनांसाठी धोका निर्माण झाला आहे. पादचाऱ्यांना चालणे कठीण बनले आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊनही संबंधित विभागाचे लक्ष वेधले गेले नाही. या परिस्थितीत तात्काळ उपाययोजना करून रस्ता स्वच्छ करणे, मातीचे ढीग हटवून डांबरीकरण करणे अत्यावश्यक आहे.
आम्हा दुचाकी चालकांना इथून रोज एमआयडीसी तसेच इतर कंपन्यांमध्ये कामाला जावे लागते. तेव्हा, जाताना व येताना रस्त्यावर कायम धूळ डोळ्यांत जात असते. इथे इमारतीचे बांधकाम चालू असते. त्यामुळे तेथील सर्व वाहनांमुळे चिखल, माती रस्त्यावरच येऊन रस्ता देखील खराब झाला आहे. संबंधित विभागाने हा रस्ता पूर्णपणे साफ करून समस्या त्वरित सोडवावी. अन्यथा दुचाकी घसरून मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरीत पावले उचलणे गरजेचे आहे.’’
- राजेंद्र आगवणे, स्थानिक रहिवासी
सध्या इथे कोणतेही बांधकाम चालू नाही. फक्त खड्डे असतील; तर ते भरून घेतले जातील. डांबराचे प्लांट पावसामुळे बंद असल्यामुळे दिवाळीनंतर सुरू झाल्यानंतर रस्त्याचे काम केले जाईल. परंतु आरोग्य विभागाने कदाचित रस्त्यावरील माती साफ करून ती बाजूला ठेवली असावी. तरी संबंधित अभियंता त्या ठिकाणी भेट द्यायला सांगून माहिती घेऊन त्यावर काम केले जाईल.’’
- संजय काशीद, कार्यकारी अभियंता, शहरी दळणवळण विभाग
CWD25A02031
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.