

Powai Hostage Case Rohit Arya Did Not Fire Says Police Complaint
Esakal
मुंबई, ता. ३१ ः ओलीसनाट्य घडवण्यासाठी चित्रपट लेखक, दिग्दर्शक रोहित आर्याने दोन महिन्यांपासून अत्यंत शांत डोक्याने नियोजित कट आखून तयारी केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. आर्याने वेबमालिकेसाठी लहान मुलांचे ऑडिशन, निवड झालेल्या मुलांसाठी अभिनय प्रशिक्षण वर्गासह मालिकेच्या चित्रीकरणाचा देखावा उभा केला होता. मालिकेची सुरुवात ओलीसनाट्याच्या प्रसंगाने होईल. त्या प्रसंगाचे चित्रीकरणही केले जाईल, असे त्याने लहान मुले, त्यांचे पालक आणि मालिकेच्या चित्रीकरणासाठी निवडलेल्या चमूला सांगितले होते. त्यामुळे प्रत्यक्ष ओलीसनाट्य आरंभले तेव्हा रंगीत तालीम सुरू असल्याचे उपस्थितांना वाटले.