पिंपरी-चिंचवड

मोशीत महिलासांठी महाबचतगट मेळावा लक्षवेध स्पोर्टस फाऊंडेशन व जिल्हा बॅंकेच्यावतीने आयोजन ही काळाची गरज ः आल्हाट

CD

मोशी, ता. २६ : समाजातील महिलांना नुसते सक्षम नव्हे तर बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्याच्या मूळ उद्देशाने मोशीतील लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशन व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यावतीने शनिवारी (ता. २५) मोशी येथील जय गणेश सभागृह येथे महिलांसाठी महाबचतगट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चिंचवड शाखेच्या व्यवस्थापक सोनाली हिंगे यांनी बँकेच्या महिला बचत गटांसाठीच्या कर्ज योजनांबाबत माहिती दिली. मोशीचे कृषी पर्यवेक्षक अमोल ढवळे, कृषी सहायक रूपाली भोसले, शशिकांत कुंभार, मनपाच्या समूह संघटिका कीर्ती वानखेडे व जयश्री पवळे यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, वसंत बोराटे, शहर उपाध्यक्ष आतिष बारणे, माजी विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट, विशाल जाधव, प्रकाश आल्हाट, प्रदीप तापकीर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मेघा पवार, रूपाली आहेर, संगीता जाधव, प्रतीक्षा आहेर, पूजा बोराडे, सुजाता आल्हाट, मनीषा पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट यांनी केले. यावेळी बचत गट महासंघाच्या अध्यक्ष कविता खराडे यांनी बचत गटांना घरगुती उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. महिलांना उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण म्हणून मेघा पळशीकर यांच्याकडून हर्बल साबण बनविण्याचेही प्रात्यक्षिक देण्यात आले. पूनम वाघ यांनी सूत्रसंचालन केले. संगीता आहेर यांनी आभार मानले.

--------------------------
फोटो ः 01889

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT