पिंपरी-चिंचवड

शहरात सोमवारी विविध प्रकल्पांचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती ः चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रासह १६ प्रकल्पांचा समावेश

CD

पिंपरी, ता. १३ : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे. यात गदिमा नाट्यगृह, तारांगण, आंद्रा प्रकल्पांतर्गत चिखली येथील १०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र यांसह १६ प्रकल्पांचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्यावतीने सोमवारी (ता. १५) सकाळी अकराला विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, संग्राम थोपटे, दिलीप मोहिते यांना निमंत्रित केले आहे.
महापालिका प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन आणि आंद्रा प्रकल्पातील चिखली जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण प्रत्यक्ष होणार असून, उर्वरित प्रकल्पांचे ऑनलाइन लोकार्पण व भूमिपूजन होईल. त्यासाठी आकुर्डी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात कार्यक्रम होणार आहे.
महापालिका हद्दीतील सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण करणे व मालमत्तांची सुधारित कर आकारणी करणे, मालमत्ता कर विभागाच्या सर्व सेवा वार्षिक पातळीवर पुरवणे यासह दिव्यांग नागरिकांकरिता निरामय आरोग्य विमा योजनेचा प्रारंभ करण्यात येत आहे.

उद्घाटने
- चिखलीतील १०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प
- सायन्स पार्कमधील तारांगण प्रकल्प
- ग. दि. माडगूळकर नाट्यगृह
- तळवडे येथील इंद्रायणी नदीवरील पंप हाउस
- बोऱ्हाडेवाडी शाळा इमारत
- मोशी सब फायर स्टेशन
- रावेत येथील उद्यान
- ‘वायसीएम’मधील निर्जंतुकीकरण पुरवठा विभाग
- ब क्षेत्रीय कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत
- नेहरुनगर येथील नवीन शाळा इमारत
- इंद्रायणीनगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र
- घरकुल चिखली येथील भाजी मंडई
- निगडी येथील लाइट हाउस प्रकल्प
- कृष्णानगर स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल लॉन टेनिस कोर्ट
- प्राधिकरण वीर सावरकर उद्यान लॉन टेनिस कोर्ट

भूमिपूजने
- नवीन प्रशासकीय इमारत
- भामा आसखेड प्रकल्पातील जॅकवेल
- पिंपरी येथील डेअरी फार्म पूल
- मोशी-डुडूळगाव येथील प्राथमिक शाळा
- गवळीनगर व कासारवाडी घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्र
- भोसरी धावडेवस्ती येथील पाण्याची उंच टाकी

 ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT