पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये दर्शन ‘मिनी खान्देश’चे : महाजन

CD

पिंपरी, ता. ३ : पिंपरी-चिंचवडमधील खान्देशी बांधवांनी संस्कृतीचा उत्साहात जागर करी शहराला ‘मिनी खान्देश’चे स्वरूप दिले आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काढले.
पिंपरी-चिंचवड येथे आयोजित खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिवनगरीतील श्री तुळजाभवानी मंदिरापासून मिरवणुक सुरू झाली. वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डनपाशी मिरवणुकीची सांगता झाली. यात शिरपूरच्या गोल्डन, तर अमळनेरच्या राधे कृष्ण बँडच्या वादनाने रंगत आणली.
धुळे आणि नंदुरबार येथील आदिवासी नृत्याविष्काराने लक्षवेधी ठरला. महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या. पुरुषांनीही पारंपरिक पोशाख घातला होता.
आहेर गार्डन येथील मुख्य गिरीश महाजन तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री कानबाई मातेचे पूजन झाले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार मंगेश चव्हाण, शंकर जगताप, उमा खापरे, राजू भोळे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी आमदार कुणाल पाटील, सुरेखा जाधव यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, ‘‘खान्देशी समाजाने पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन आपली संस्कृती जपली. कानबाई ही केवळ देवी नसून शक्तीचे प्रतीक आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोचवणे हे आपले कर्तव्य आहे.’’
प्रमुख संयोजक नामदेव ढाके यांनी प्रास्ताविक केले. हेमलता चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत चव्हाण यांनी आभार मानले.
रात्री पार पडलेल्या संगीतमय भक्ती कार्यक्रमात सागर देशमुख, दिलीप शिंदे, कुणाल महाजन व दिनेश शिंदे यांनी श्री कानबाई मातेची भक्तिगीते सादर केली. या उत्सवाचा समारोप सोमवारी सकाळी रावेत येथील जाधव घाटापाशी होईल.
--------------------
फोटो
37028
वाल्हेकरवाडी : श्री कानबाई माता उत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी खान्देश बांधव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झोपलेले गृहमंत्री जागे होतील अशी अपेक्षा, रोहित पवारांनी व्यक्त केला संताप; मध्यरात्री ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात

ENG vs IND: जो रुट भारतासाठी ठरलाय डोकेदुखी! ३९ वे कसोटी शतक ठोकत केलेत कोणालाच न जमलेले पराक्रम

Mahadevi Elephant : माधुरी हत्तीण कोल्हापूरला परत मिळणार का? कोणत्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार? वाचा...

पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण, शिवीगाळ; गुन्हा नोंदवता येणार नाही, पोलिसांचं पत्र

Mahadevi Elephant: ‘महादेवी’साठी जनतेची वज्रमूठ; संतप्त कोल्हापुरकरांची जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक पदयात्रा

SCROLL FOR NEXT