पिंपरी-चिंचवड

ध्यासातूनच उद्योजक होणे शक्य

CD

पिंपरी, ता. १६ ः ‘‘ग्राहक राजा ही भावना, नावीन्यपूर्ण कल्पना, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सखोल अभ्यास, आत्मविश्वासाने भीतीवर मात, काळाबरोबर बदलण्याची वृत्ती आणि वेड लागल्याप्रमाणे उत्कट ध्यास घेतल्याशिवाय उद्योजक होता येत नाही,’’ असे प्रतिपादन अजय मुंडे यांनी केले.
महाशिवरात्री महोत्सवानिमित्त शिवशंभो फाउंडेशनतर्फे शाहूनगर येथे आयोजित शिवशंभो व्याख्यानमालेत ‘मला उद्योजक व्हायचंय’ विषयावरील व्याख्यानात मुंडे बोलत होते. आमदार उमा खापरे, उद्योजक आबा नागरगोजे, ॲड. विजय ढाकणे, कामगार नेते किशोर सोमवंशी, व्याख्यानमाला समन्वयक राजेंद्र घावटे, फाउंडेशनचे अध्यक्ष संजय तोरखडे आदी उपस्थिती होते. फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे यांनी प्रास्ताविक केले. मुंडे म्हणाले, ‘‘पूर्वी करिअरच्या मोजक्याच क्षेत्रात संधी होत्या. वैद्यकीय, अभियांत्रिकी, शैक्षणिक क्षेत्रांत व्यवसाय अन् नोकरी सहज मिळायची. आता अनेक क्षेत्रांत संधी असल्या तरी प्रचंड स्पर्धा आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन नोकरी मिळण्याची शाश्वती फक्त एक टक्का आहे. व्यावसायिक सेवा प्रदान करणारे, पारंपरिक व्यापारी आणि नवीन वस्तूंची निर्मिती करणारे असे उद्योजकांचे सर्वसाधारणपणे तीन प्रकार आहेत. उद्योजक होण्यासाठी वयाची कोणतीही अट नसली तरी कमी वयात चुकांची दुरुस्ती अन् जोखीम स्वीकारण्याची क्षमता जास्त असते. त्यासाठी मनाचा निर्धार हीच योग्य वेळ असते. कोणताही व्यवसाय स्थिरस्थावर होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागतो.’’ राजेश हजारे, काळुराम साकोरे, ॲड. रुपाली तोरखडे, संतोष रांजणे, दत्तात्रेय भुसे, विद्याधर राणे, संजय देशमुख यांनी संयोजन केले. सविता बारवकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पवार यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT