पिंपरी-चिंचवड

नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

CD

पिंपरी, ता. २० : महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा समितीच्या वतीने नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.
चिंचवडमधील सायन्स पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील अखंड सेवेबद्दल तुकाराम विष्णू आढाव यांना पुणे जिल्हा समाज भूषण गौरव पुरस्कार, गजानन भालेकर यांना आदर्श कार्यकर्ता, नितीन कुटे यांना आदर्श गुणवंत कार्यकर्ता तर विलास गोपाळ रसाळ यांना दिव्यांग आदर्श कार्यकर्ता पुरस्कार सदगुरू माऊली महाराज वाळुंजकर यांच्या प्रदान करण्यात आला.
दरम्यान, श्वेता संतोष दोडके हिने दहावीच्या परीक्षेत तर व स्नेहा सतीश यादव हिने बारावीच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचाही विशेष सन्मान केला. यासह इतर पन्नास विद्यार्थ्यांचाही सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोक नारायण मगर होते. दरम्यान, प्राचार्य दत्तात्रेय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना ‘शिक्षण व संस्कार’ या विषयावर मार्गदर्शन केले.
पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर, जिल्हा महिलाध्यक्षा अर्चना नेवकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब खंडागळे, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ शेळके, माजी जिल्हाध्यक्ष रमेश राऊत, माजी महिला जिल्हाध्यक्ष अनिता मगर, माजी सरपंच गणपत पवार, पुणे शहर महिलाध्यक्ष सुवर्णा सुर्वे, शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड, शंकरराव रायकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनील वाळुंज, भाऊसाहेब यादव, बळिराम मंडलिक, अंकुश जाधव, नितीन सुरवसे, दत्तात्रय वाळुंजकर, हेमंत भालेराव, आदिनाथ गायकवाड, संतोष रसाळ आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष प्रभाकर भालेकर यांनी तर स्वागत उपसरपंच अरुण ढमाले यांनी केले. सूत्रसंचालन तानाजी वाळुंजकर यांनी केले. गणेश राऊत यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT