पिंपरी-चिंचवड

‘आरटीई’साठी पाल्यांची आजपासून नोंदणी

CD

पिंपरी, ता. २२ : ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात होत असून, पहिल्या टप्प्यामध्ये शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पाल्यांची नोंदणी गुरुवारी (ता. २३) दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होणार आहे.
आरटीईअंतर्गत शहरातील १८२ शाळांनी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी काही शाळांनी याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे, यावर्षी प्रवेश मिळविण्यासाठी पालकांचा कस लागणार आहे.

अर्ज कसा भरावा...
सर्वप्रथम पालकाने अर्जाची नोंदणी करावी मग आपल्याला अर्जाचा क्रमांक आणि पासवर्ड मिळेल. मोबाईलवरील तो पासवर्ड आणि अर्ज क्रमांक टाकून लॉगिन करावे. बालकाची आणि पालकांची सर्व माहिती अचूक व खरी भरावी. परिसरातील १ किंवा ३ किलोमीटरच्या आत शाळा दिसत असल्यास, त्या शाळेला टिक करावे. आपल्या पाल्याला ज्या वर्गामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, तो वर्ग निवडावा. शाळा जवळपास असेल तर शाळेची यादी तुम्हाला दिसेल, त्या शाळेच्या यादीतील शाळेवर तुम्हाला टिक करायचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT