पिंपरी-चिंचवड

किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत वातावरण महापालिकेचे

CD

पिंपरी, ता. २६ ः चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता. २६) एक-दोन किरकोळ वादाचे प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. निवडणूक विधानसभेची असली तरी, दिवसभरातील वातावरण महापालिकेच्या वॉर्डस्तरीय निवडणुकीसारखे होते. स्थलांतरित झालेले मात्र, मतदान कायम असलेल्या मतदारांनीही मिळेल त्या वाहनाने येऊन मतदानाचा अधिकार बजावला.

केंद्राबाहेर पक्षाचे बूथ
मतदान केंद्रांपासून दोनशे मीटर क्षेत्रात निर्बंध होते. त्याबाहेर भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसने व काही ठिकाणी अपक्ष उमेदवार कलाटे यांनीही मतदार सहायता केंद्र उभारले होते. मात्र, काही केंद्रावर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी, मतदार चिठ्ठी घेण्यासाठी गर्दी होती. तर, काही सहायता केंद्र ओस पडले होते. केवळ, एक तंबू, टेबल व खुर्च्या होत्या. कार्यकर्तेच नव्हते.

रिक्षाची व्यवस्था
मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी रिक्षांची व्यवस्था केली होती. मतदान केंद्राच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर या रिक्षा उभ्या केल्या होत्या. महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, असाह्य मतदारांशी संपर्क साधून कार्यकर्ते त्यांना रिक्षाने जाण्याची विनवणी करत होते. सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड भागात असे चित्र पहायला मिळाले.

उमेदवाराचे भित्तिपत्रके
प्रचाराची मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी प्रचार फलक, भित्तिपत्रके काढून टाकायची असतात किंवा झाकून ठेवायची असतात. आढळल्यास निवडणूक विभागाकडून कार्यवाही केली जाते. मात्र, जुनी सांगवीतील ढोरे नगरमधील डीपी बॉक्सवर एका अपक्ष उमेदवाराचे प्रचाराचे भित्तिपत्रके तशीच होती. त्या बाबत माहिती मिळाल्यानंतर निवडणूक विभागाने ती पत्रके काढून टाकली.

आजीबाई आल्या हडपसरवरून
पिंपळे निलख येथील केंद्राबाहेर दुपारी एकच्या सुमारास साठीतील आजी भेटल्या. ‘मला विशालनगरला जायचे आहे, बस कुठून मिळेल,’ असे विचारले. अधिक चौकशी अंती, त्या म्हणाल्या, ‘मी आधी इथेच राहिले होते. आता हडपसरला राहायला गेले. पण, मतदान इथेच असल्याने आले होते. जवळच उभ्या असलेल्या कार्यकर्त्याने त्यांना रिक्षात बसवून पाठवले.

प्रचारातही धामधूम
भाजप, राष्‍ट्रवादी व अपक्ष उमेदवाराने प्रचारासाठी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला. स्वतःच्या नावाची गुंफण असलेली गाणी, भित्तिपत्रके, मतदार चिठ्ठ्या, जाहिरात फलकांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तीनही उमेदवारांनी २१ ते २५ लाख रुपयांपर्यंत प्रचारावर खर्च केला.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: नाशिकात ५ तर दिंडोरीत ६ उमेदवारी अर्ज बाद

SCROLL FOR NEXT